पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी (२० फेब्रुवारी) जम्मूच्या दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मूमध्ये ३२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.पंतप्रधान मोदींनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) जम्मू, IIM बौद्ध गया आणि IIM विशाखापट्टणमचे उद्घाटन केले. तसेच देशभरात केंद्रीय विद्यालय (KV) साठी २० नवीन इमारती आणि १३ नवीन नवोदय विद्यालय (NV) इमारतींचे उद्घाटन केले.तसेच जम्मूतील मौलाना आझाद स्टेडियममध्ये भरवण्यात आलेल्या सभेला पंतप्रधान मोदींनी संबोधित करत जम्मूमध्ये होत असलेल्या कामाची माहिती जनतेला दिली.
‘विकसित भारत विकसित जम्मू’ कार्यक्रम
पंतप्रधान मोदींनी सुमारे १५०० नवीन सरकारी नियुक्त्यांना नियुक्तीचे आदेश वितरित केले. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या इलेक्ट्रिक ट्रेनला आणि सांगलदान स्टेशन ते बारामुल्ला स्टेशनदरम्यानच्या ट्रेन सेवेला हिरवा झेंडा दाखवला.जम्मूमध्ये ‘विकसित भारत विकसित जम्मू’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. तसेच या कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी असलेले लाल मोहम्मद यांच्याशी देखील संवाद साधला.
जम्मू-काश्मीर हे शिक्षण आणि कौशल्याचे मोठे केंद्र बनत आहे
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात जम्मू-काश्मीरमध्ये शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या कामांची माहिती दिली. ते म्हणाले की, उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना इतर राज्यात जावे लागते. आज जम्मू-काश्मीर हे शिक्षण आणि कौशल्याचे मोठे केंद्र बनत आहे. आपल्या सरकारने गेल्या १० वर्षांत हाती घेतलेले शिक्षण आधुनिकीकरणाचे ध्येय आज येथे अधिक विस्तारत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
मोदीची गँरंटी म्हणजे पूर्ण होण्याची गँरंटी
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, मला अजूनही लक्षात आहे की, डिसेंबर २०१३ मध्ये मी भाजपच्या ‘ललकार रॅली’ला आलो होतो.तेव्हा याच मैदानात मी तुम्हाला काही गॅरंटी दिली होती.तेव्हा मी प्रश्न उपस्थित केला होता की, जम्मूमध्ये IIT आणि IIM सारख्या संस्था का बांधल्या जात नाहीत?. आज या ठिकाणी दोन्ही संस्था आहेत.त्यामुळे मोदीची गँरंटी म्हणजे पूर्ण होण्याची गँरंटी, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
हिंदू नावाने राहणारे मुस्लिम बांगलादेशी दाम्पत्य अटकेत
मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर
दातांवर शस्त्रक्रिया करताना युवक दगावला!
कोलकत्ता उच्च न्यायालयाने ममता सरकारला फटकारले
जम्मू काश्मीर आज विकासाच्या निर्धाराने पुढे जात आहे
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ‘आता आम्ही विकसित जम्मू-काश्मीरची शपथ घेतली आहे. मला तुमच्यावर विश्वास आहे की, आपण मिळून जम्मू-काश्मीरचा विकास करू. गेल्या ७० वर्षांपासून अपुरी राहिलेली तुमची स्वप्ने येत्या काही वर्षात मोदी पूर्ण करतील.असेही काही दिवस होते की, जेव्हा जम्मू-काश्मीरमधून फक्त निराशाजनक बातम्या येत होत्या.बॉम्ब, बंदुका, अपहरण..अशाच गोष्टी जम्मू-काश्मीरसाठी दुर्दैवी बनल्या होत्या.परंतु, आज जम्मू-काश्मीर विकासाच्या निर्धाराने पुढे जात आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
स्वतःच्या कुटुंबाचा विचार करणारी सरकारे तुमचा विचार करणार नाही
ते पुढे म्हणाले, ‘जम्मू आणि काश्मीरच्या राजकारणात अनेक दशकांपासून घराणेशाही होती.कौटुंबिक राजकारण करणाऱ्यांनी नेहमीच फक्त स्वतःचे हित पाहिले , तुमची कधीही पर्वा केली नाही.घराणेशाहीच्या राजकारणाचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर तो आपल्या तरुणांना.जी सरकारे आपल्या कुटुंबीयांकडे लक्ष देण्यास व्यस्त असतात, ती राज्यातील तरुणांकडे लक्षही देत नाहीत. अशी कुटुंबाभिमुख सरकारे तरूणांसाठी योजना बनवण्यासही प्राधान्य देत नाहीत. फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विचार करणारी ही लोक तुमच्या कुटुंबाचा कधीच विचार करणार नाहीत.मला याचा आनंद आहे की, या कौटुंबिक राजकारणातून जम्मू-काश्मीरला स्वातंत्र्य मिळत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.