जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानचे हा हल्ला केल्याचे तपासात समोर येत आहे. मात्र, दरवेळी प्रमाणे पाकिस्तानने आपले हात वर केले आहेत. पाकिस्तानने या हल्ल्याचा निषेध करत दहशतवादी संघटनांना आश्रय दिल्याच्या दाव्यांवर नकार दिला. परंतु, एकीकडे नकार द्यायचा आणि दुसरीकडे दहशतवाद्यांना पाठींबा द्यायचा हा पाकचा स्वभावच आहे. कारण, पाकच्या उपप्रंतप्रधानांनी दहशतवाद्यांना पाठींबा नाहीतर थेट ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हटले आहे. पाकिस्तानचे उपप्रंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे कौतक करत त्यांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हटले आहे.
इस्लामाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना, पाकिस्तानचे उपपंतप्रधान दार म्हणाले, “जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम जिल्ह्यात २२ एप्रिल रोजी हल्ले करणारे स्वातंत्र्यसैनिक असू शकतात”. सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या मुद्द्यावर बोलताना दार म्हणाले, “पाकिस्तानमधील २४ कोटी लोकांना पाण्याची गरज आहे. तुम्ही ते थांबवू शकत नाही. हे युद्धासारखे आहे. कोणतेही निलंबन किंवा उल्लंघन स्वीकारले जाणार नाही”. “जर पाकिस्तानवर थेट हल्ला झाला तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
हे ही वाचा :
दहशतवाद्यांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणणाऱ्या उपपंतप्रधानांवर पाकिस्तानी क्रिकेटपटू संतापला
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आसिफ शेखचे घर उडवले
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल ठोकरच्या घरावर चालवला बुलडोझर
पाकिस्तानकडून कुरघोड्या सुरूचं; नियंत्रण रेषेवर रात्रभर गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही गुरुवारी (२४ एप्रिल) राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर सिंधू पाणी करारांतर्गत पाकिस्तानसाठी राखीव ठेवलेल्या पाणी थांबवले तर हा प्रयत्न युद्धाचा गुन्हा मानला जाईल, असे म्हटले.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी म्हटले की, भारत संपूर्ण पाकिस्तानमध्ये हल्ल्यांची योजना आखत आहे. जर भारताने आमच्या नागरिकांना इजा केली तर भारतीय नागरिकही सुरक्षित राहणार नाहीत. भारताच्या प्रत्येक हल्ल्यास उत्तर देवू, असे मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी म्हटले.