हरयाणातले जेजेपी आमदार देवेंद्र सिंह बबली यांचा भाजपमध्ये प्रवेश !

माजी मंत्री सुरिंदर सांगवानचा मुलगाही भाजपात सामील

हरयाणातले  जेजेपी आमदार देवेंद्र सिंह बबली यांचा भाजपमध्ये प्रवेश !

हरियाणाच्या विधानसभेच्या तारखा जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात पक्षांतराची प्रक्रिया सुरु झाली आहे. जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) आमदार देवेंद्र सिंह बबली यांनी सोमवारी (२ सप्टेंबर) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत सुनील सांगवान यांनीही भाजपची साथ धरली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर देवेंद्र म्हणाले की,  हरियाणात भाजपची लाट आहे. भाजपचे सरकार स्थापनेसाठी जनता उत्सुक असल्याचेही त्यांनी म्हटले. यावेळी भाजप हरियाणा प्रमुख मोहनलाल बडोली, निवडणूक सहप्रभारी बिप्लब देव आणि राज्य युनिटचे माजी प्रमुख ओपी धनखर उपस्थित होते.

टोहाना मतदारसंघाचे आमदार देवेंद्र बबली यांनी जेजेपीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेत्यांचीही भेट घेतली होती. मात्र, तिकीटाचा मुद्दा निकाली निघत नसल्याने त्यांनी आपली भूमिका बदलली. मागील निवडणुकीत देवेंद्र सिंह बबली यांनी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा ५० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. देवेंद्र बबली हे जेजेपी-भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले आहेत.

हे ही वाचा : 

बॅडमिंटनमध्ये भारताचा जलवा, नितेश कुमारने मारलं गोल्ड !

दंगलींसाठी उतावीळ कोण? का हव्या आहेत दंगली?

शाळकरी मुलींची छेडछाड करणाऱ्या नराधम अय्याज काझीचे खोके उध्वस्त

मुस्लिम युवकाने कुराणची प्रत जाळत सनातनचा केला स्वीकार!

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर देवेंद्र सिंह बबली यांचीही प्रतिक्रिया आली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळणार असल्याने मला त्याचा अभिमान वाटत आहे. आम्ही आमचे काम जनतेपर्यंत घेवून जाऊ. टोहणामध्ये पूर्वी कामे नव्हती, आता तिथला विकास बघा. हरियाणात आम्ही तिसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन करू, असे आश्वासन देवेंद्र बबली यांनी जनतेला दिले. तसेच हरियाणाच्या भोंडसी तुरुंगाचे माजी प्रमुख आणि माजी मंत्री सुरिंदर सांगवान यांचा मुलगा सुनील सांगवान यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Exit mobile version