24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषआव्हाडांना भीती सीबीआयच्या तपासाचा ससेमिरा मागे लागण्याची

आव्हाडांना भीती सीबीआयच्या तपासाचा ससेमिरा मागे लागण्याची

अनंत करमुसेला बंगल्यावर नेऊन मारहाण केल्याचे प्रकरण

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यापुढील अडचणी पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत. ठाण्यातील एक कार्यकर्ते अनंत करमुसे यांना बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण करण्याचे प्रकरण आव्हाड यांच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेलेले असताना या प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकारने सीबीआय चौकशीस आपली हरकत नसल्याचे म्हटले असले तरी यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र १२ डिसेंबरला न्यायालयात सादर करण्यास सांगितले आहे.

सीबीआयच्या चौकशीचा ससेमिरा लागल्यास आव्हाड यांना त्याचा सामना करावा लागेल. यावरूनच त्यांनी ट्विट करत डरेंगे नही लडेंगे असा पवित्रा घेतला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात की, १. गुन्हा, २. गुन्हा पूर्ण सरकारी आदेशांनी आता ३. गुन्हा संपूर्ण तपास पूर्ण. चार्जशीट कोर्टात दाखल. उच्च न्यायालयात सीबीआयने चौकशी करावी ही याचिका फेटाळली. आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू. पोलिस खात्यावर अविश्वास दाखवत सीबीआयकडे देण्याची सरकारची तयारी. त्यानंतरच्या ट्विटमध्ये ते आपण याला घाबरणार नसल्याचेही म्हणतात. ज्याच्या मागे आशीर्वाद रूपाने उभी आहे आई, सरकार त्याला काय घाबरवणार दाखवून सीबीआय.

हे ही वाचा:

 परवानगीशिवाय अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि आवाज वापरता येणार नाही!

श्रद्धा वालकर प्रकरणातील लव्ह जिहाद अंँगलबद्दल काय बोलल्या स्मृति इराणी

आठ तासांची फिल्डिंग आणि चोर आले ताब्यात

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीला आराम पडतोय!

 

यावर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. भातखळकर यांनी म्हटले आहे की महाविकास आघाडी सरकारच्या काळात जी सत्तेची मस्ती दाखविली होती, ती आता उतरणार आहे.

करमुसेप्रकरण तर मविआच्या काळातील आहे. आता सरकार बदलल्यानंतरही आव्हाड यांचा स्वभाव कायम असल्याच्या घटना घडल्या. ठाण्यात हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडण्यासाठी आलेले असताना आव्हाडांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला बेदम मारहाण केली. त्यावरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा