राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचे ‘अशुद्ध’ ट्विट व्हायरल

आपल्या नेत्यांचे आभार मानण्यासाठी केले होते ट्विट

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचे ‘अशुद्ध’ ट्विट व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉलमधील प्रेक्षकाला मारहाण प्रकरणात जामीन मिळाला. त्यानंतर त्यांनी १३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री ट्विट करून आपल्या पक्षातील नेत्यांचे आभार मानणारे ट्विट टाकले. मात्र त्यात लिहिण्यात आलेल्या मराठी भाषेवरून आव्हाड यांच्यावर टीका होत आहे.

मला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेल मध्ये टाकनाऱ्या सरकारच्या विरिधात उभे रायहिलेले राष्ट्रवादीचे सर्व कार्यकरते उघड समर्थन देणारे नेते सुप्रिया सुळे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, निलेशालंके व इतर अनेकांचे माना पासून आभार शब्द देतो शिवाजी राजेंच्या इतिहासाचे विकॄतीकरण होऊ देणार नाही. अशा शब्दांत आव्हाड यांनी हे ट्विट केले. त्यावरून त्यांना अनेकांनी ट्रोल केले आहे. अशा प्रकारची अशुद्ध मराठी भाषा वापरण्याची काय गरज होती. रात्री १.३० वाजता असा मेसेज टाकताना आपण भाषा चुकीची वापरत आहोत, याचे भान राहिले नाही का, असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.

या पाच ओळीच्या ट्विटमध्ये सहा चुका झालेल्या आहेत. त्यावरून ही टीका होत आहे.

हे ही वाचा:

टिपू सुलतानाचा पुतळा बसवला तर बाबरी ढाचा सारखी अवस्था करू

दोन विमाने हवेतच एकमेकांवर आदळली आणि उसळला आगीचा डोंब

तेलंगणात सर्वत्र कमळ फुलणार

सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे शिंदे गटात

जितेंद्र आव्हाड यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलमध्ये एका प्रेक्षकाला बेदम मारहाण केली होती. त्याचे कपडे फाटेपर्यंत त्याला मारले होते, विशेष म्हणजे त्याच्या पत्नीसमोरच या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला मारले. आव्हाड हेही तेव्हा त्या थिएटरमध्ये उपस्थित होते, मात्र त्यांनी ही हाणामारी थांबविली नाही. त्यानंतर यासंदर्भात वर्तकनगर पोलिस ठाण्यात आव्हाड यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तिथे त्यांना अटक करण्यात आली. एक रात्र पोलिसांच्या ताब्यात गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना जामीन मंजूर झाला.

Exit mobile version