गेल्या काही अनेक दिवसांपासून राज्यातील शैक्षणिक अभ्यासक्रमात मनृस्मृतीचा सहभाग होण्यावरुन चर्चा सुरु आहे.परंतु, यासंदर्भात केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना फोन करुन चर्चा केली. त्यानंतर मंत्री केसरकर यांनी, मनुस्मृतीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात सहभाग करण्याचा कुठलाही विषय नसल्याचे स्पष्ट केले आहे.मात्र, तरीही काही विरोधकांकडून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.तसाच प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी करायचा प्रयत्न केला मात्र तो त्यांच्याच अंगलट आला आहे.
मनुस्मृती प्रकरणावरुन जितेंद्र आव्हाडांनी आज(२९ मे) महाडमधील ऐतिहासिक चवदाळ तळ्यावर जाऊन आंदोलन केले. मात्र, यावेळी त्यांच्याहाताने मनुस्मृती फाडताना डॉ. बाबासाहेब यांचा फोटो फाडला गेला.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यावरून राज्यात एकच वातावरण तापलं आणि आव्हाडांवर टीका करण्यास सुरुवात झाली.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री शिंदेंविरोधातला ‘रोखठोक लेख’ राऊतांना भोवणार!
‘आप’ने झटकले हात, “काँग्रेससोबतची आमची युती कायमची नाही!”
ब्लड सॅम्पलची अफरातफर करणारे ससूनमधील तीन जण निलंबित
‘पेंच व्याघ्र प्रकल्प’ राज्यातील पहिला ‘प्लास्टिक मुक्त’ व्याघ्र प्रकल्प!
यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि भाजपकडून जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टीका केली जात आहे.महाडमध्ये ‘मनुस्मृती’चं दहन करतांना स्टंटबाजीच्या नादात जितेंद्र आव्हाडांनी डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा फाडल्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी इशाराच दिला आहे. डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा फाडून त्यांनी राष्ट्राचा अवमान केला आहे, त्यामुळे आव्हाडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही मिटकरी यांनी केली आहे. तसेच अनेक ठिकाणी जितेंद्र आव्हाडांचे फोटो देखील जाळण्यात आले आहेत.
दरम्यान, जितेंद्र आव्हाडांनी घडलेल्या घटनेवरुन स्पष्टीकरण दिलं आणि माफी मागितली.ते म्हणाले की, मनुस्मृती लिहिलेलं पोस्टर फाडण्यात आलं.त्यावर बाबासाहेबांचा फोटो हे लक्षात आलं नाही.भावनेच्या भरात हे सर्व घडून गेलं.माझ्याकडून चूक झालेली आहे हे मी मान्य करतो आणि आम्ही संपूर्ण देशाची माफी मागतो.