जितेंद्र आव्हाडांनी फ्रान्सला जाऊन निवडणूक लढवावी

भाजपा नेते प्रवीण दरेकर यांचा टोला

जितेंद्र आव्हाडांनी फ्रान्सला जाऊन निवडणूक लढवावी

विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हंबर रोजी लागणार असून पक्षांकडून आतापासूनच आमदारांसाठी हॉटेल बुकिंगची योजना आखण्यात येत असल्याची बातमी समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर, आम्ही फ्रान्सला जाऊ अथवा इटलीला जाऊ असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला आहे. जितेंद्र आव्हाडांनी फ्रान्सला जाऊन निवडणूक लढवावी, असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

आमदारांच्या हॉटेल बुकिंगवर भाष्य करतात आव्हाड म्हणाले, आम्ही फ्रान्स, इटली अथवा स्वित्झर्लंडला जाऊ. यावेळी उबाठा गटाचे नितीन देशमुख यांचाही उल्लेख करण्यात आला, जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारला तेव्हा नितीन देशमुख हे सुद्धा इतर आमदारांसोबत सुरतला गेले होते. पण, ते रातोरात परत आले. यावरून जितेंद्र आव्हाड म्हणाले, कोणताही आमदार पळून जाऊ नये म्हणून आम्ही तिकडे जात आहोत.

यावर भाजपा नेते दरेकर म्हणाले, जितेंद्र आव्हाडांनी फ्रान्सला जाऊन निवडणूक लढवावी आणि फ्रान्सचे प्रमुख व्हावे. बोलायचं म्हणून काहीतरी बोलायचं, निवडणुकीवर बोलले पाहिजे, आकलन, विश्लेषण केले पाहिजे. गुहाटीला गेले तेव्हा एवढी चर्चा केली आता फ्रान्सला गेले तर काय होईल.

हे ही वाचा : 

मुरादाबादमध्ये मिडीया जिहाद? सक्रीय पत्रकारांची यादी जाहीर

युवराज म्हणतात, अदानींना अटक करा!

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचा राहुल गांधींवर जोरदार प्रहार

महायुतीला स्पष्ट बहुमत, १७५ जागा मिळतील!

 

 

Exit mobile version