27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषसेहवाग पाकिस्तानला म्हणाला 'झिंदाभाग'!

सेहवाग पाकिस्तानला म्हणाला ‘झिंदाभाग’!

आव्हान संपुष्टात आल्यामुळे उडवली खिल्ली

Google News Follow

Related

आशिया चषकानंतर आता विश्वचषकातील पाकिस्तानच्या आशा जवळपास संपल्या आहेत.बेंगळुरू येथे गुरुवारी न्यूझीलंडने श्रीलंकेला हरवल्यानंतर २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातून पाकिस्तान जवळपास बाहेर पडल्यानंतर, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर पाकिस्तान क्रिकेट संघाला ट्रोल केले आहे.वीरेंद्र सेहवागने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वीच बाबर आझमच्या संघाला बाय-बाय म्हटले आहे.

शनिवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर पाकिस्तानचा अंतिम सामना इंग्लंडशी होणार आहे.सेमीफायनल मध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी पाकिस्तान संघाला पहिला फलंदाजी करावी लागणार आहे.परंतु इंग्लंड संघाने नाणे फेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर त्याच क्षणी विश्वचषकातुन पाकिस्तान संघचा प्रवास संपणार आहे.जर पाकिस्तानी संघ फलंदाजी करेल तर तो त्याच्या नशिबावर अवलंबून असणार आहे.

हे ही वाचा: 

सौरव दादाने सांगितली रोहित शर्माच्या कर्णधार पदामागाची रंजक गोष्ट

पॅलेस्टिनी दहशतवाद्याचे कौतुक करणाऱ्या सुधन्वा देशपांडेंना IIT मध्ये आमंत्रण कशासाठी?

भाजपचे दिग्गज नेते, नागालँडचे माजी राज्यपाल पीबी आचार्य यांचे निधन!

तडीपारी प्रकरणातून राज ठाकरे मुक्त

सेमीफायनलच्या गणितानुसार पात्र होण्यासाठी पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करत ४०० पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील आणि इंग्लंडला २८८ धावांनी पराभूत करावे लागेल.त्याचबरोबर गोलंदाजी केली तर इंग्लंडला १२ धावांवर ऑलआऊट करावे लागेल, जे अशक्य आहे. हे लक्षात घेऊन वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर पाकिस्तानची खिल्ली उडविली आहे.

सेहवागने एक पोस्ट शेअर केले ज्यामध्ये लिहिले आहे, “बाय, बाय, पाकिस्तान” (BYE BYE PAKISTAN).पाकिस्तान खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी सुरक्षित उड्डाणासाठी सेहवागने शुभेच्छा दिल्या आहेत. “पाकिस्तान झिंदाभाग! घरी परतण्यासाठी सुरक्षित उड्डाण करा. ” या ट्विटनंतर केलेल्या रिट्विटमध्ये सेहवागने श्रीलंका संघावरही टिका केली. त्यांने लिहले की “पाकिस्तान संघाला जो संघ सपोर्ट करतो तो देखील त्यांच्या सारखाच खेळतो. सॉरी श्रीलंका”, असे ट्विट करत सेहवागने पाकिस्तानची खिल्ली उडविली उडवली असून सेहवागच्या ट्विटवर क्रिकेटप्रेमी मजा घेत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा