जिओचे नेटवर्क गायब; सोशल मीडियावर वापरकर्त्यांच्या तक्रारी

इंटरनेट सेवाही ठप्प

जिओचे नेटवर्क गायब; सोशल मीडियावर वापरकर्त्यांच्या तक्रारी

जिओ वापरकर्त्यांना सध्या इंटरनेट सुविधा वापरण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रिलायन्सच्या जिओचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जिओचे सिमकार्ड आणि इतर सुविधा वापरणाऱ्यांना नेटवर्क मिळत नाही आहे. त्यामुळे हजारो वापरकर्त्यांनी त्यांची तक्रार सोशल मीडियावर मांडली आहे. अद्याप याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही.

मंगळवार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास जिओचे नेटवर्क गायब झाले. यानंतर इंटरनेटही बंद झाल्याने लोकांनी तक्रार करण्यास सुरुवात केली. मुंबईतून १० हजाराहून अधिक लोकांनी नेटवर्क मिळत नसल्याची तक्रार केली आहे. मोबाईलला सिग्नल मिळत नसल्याने कॉलिंग, मेसेजिंग अशा सुविधा वापरणे ग्राहकांना कठीण होऊन बसले आहे. शिवाय इंटरनेटही चालत नसल्यामुळे अनेकांची कामे खोळंबली आहेत. तर, अनेकांनी जिओ फायबर चालत नसल्याचे म्हटले आहे.

मुंबईसह देशभरात आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणपती विसर्जन होत आहे. सकाळीच मुंबईतील मोठ्या मंडळातील गणपती विसर्जनासाठी बाहेर पडले आहेत. त्यामुळे लाखो गणेश भक्त विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. अशावेळी जिओ सारख्या मोठ्या कंपनीचे नेटवर्क डाऊन झाल्यामुळे अनेकांना अडचणी उद्भवत आहेत. एकमेकांना संपर्क करणे कठीण होऊन बसले आहे. शिवाय अनेक महत्त्वाच्या कामांचा खोळंबा झाल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा:

नागालँड नागरिक हत्या प्रकरण: ३० जवानांवरील फौजदारी खटला रद्द

स्वयंसेवक ते पंतप्रधान… कसा होता नरेंद्र दामोदरदास मोदींचा ७४ वर्षांचा प्रवास?

अल्पसंख्यांकांवरून भारतावर टिपण्णी करण्यापूर्वी इराणने स्वतःचे रेकॉर्ड्स बघावेत

मुंबईत गणपती विसर्जनासाठी २५ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

सोशल मीडियावर याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ग्राहक कंपनीला टॅग करून लवकरच ही समस्या सोडवण्याची मागणी करत आहेत. काही ग्राहक यामुळे त्यांच्या कामावर परिणाम झाल्याची तक्रार करत आहेत. या नेटवर्क बंदमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कंपनीकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, तांत्रिक बिघाड हा यामागचे शक्यतो कारण असावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Exit mobile version