राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री. त्यांचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये १२ जानेवारी १५९८ साली झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, मात्र त्यासाठी त्यांना माँ साहेब जिजाऊ यांनी प्रेरित केले.जिजाऊंनीच त्यांना स्वराज्याची वाट दाखवली. याच प्रेरणेमुळे स्वराज्याचा पाया रचला गेला. त्यामुळे जिजाऊंचा मंदिर राजगडाच्या पायथ्याला उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या मंदिरात ९२ किलो सोन्याची जिजाऊंची मूर्ती असणार आहे.
जिजाऊंच्या मंदिराच्या शुभारंभासाठी अनेकांना निमंत्रण पाठवले जात आहे. राजगडाच्या पायथ्याशी हे मंदिर असणार आहे. ६ जूनला पाल गावात मंदिराच्या कामाचा होणार शुभारंभ करण्यात येणार आहे.
राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. त्याच ठिकाणी जिजाऊंचे मंदिर उभारले जाणार आहे.जे राज्यातले प्रथमच जिजाऊंचे भव्य मंदिर उभे राहणार आहे.
हे ही वाचा:
गाढवाशी वाद, अर्थात मालवणी वस्त्रहरण
दोन महिलांच्या भांडणानंतर गोळीबार, एका महिलेने गमावला जीव
दंतेवाड्यात दोन महिने आधीच पेरण्यात आली होती स्फोटके !
शंभरीतली ‘मन की बात’आणि मोदींना दिलेल्या ९१ शिव्या
कर्तव्य व व्यवहाराची सांगड घालून विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या जिजाबाई म्हणजे एक धीरगंभीर व्यक्तिमत्त्व होते. प्रत्येक पराक्रमी पुरुषाचे ध्येय एकच असते आणि ते पारतंत्र्यात असणाऱ्या जनतेला स्वातंत्र्य मिळवून देणे ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. तिचेच गुण शिवरायांमध्ये दिसत होते.
आईचा स्वाभिमान, वडिलांचा पराक्रम आणि सभोवतीची परिस्थिती याची जाणीव शिवबांच्या ठायी एकवटली होती.जिजाबाईंची देवावर नितांत श्रद्धा होती. त्या दररोज देवदर्शनास जात तेव्हा त्यांच्यासोबत शिवरायही असे. देवळातल्या भग्न मूर्ती, तोडफोड दाखवून त्या शिवरायांच्या मनात त्यांचे पुनरुत्थान करण्याचे बीज पेरत. त्याच वेळी हा अन्याय, विध्वंस करणाऱ्या यवनांविषयी त्या शिवबांना माहिती सांगायच्या. ते ऐकून शिवबा क्रोधीत व्हायचे. आईने सांगितलेल्या रामायण, महाभारतातल्या कथा ऐकून त्यांच्यातही स्फुरण चढायचे. केव्हा एकदा मीपण पापी, अन्यायी, लोकांना शासन करतो, हाती तलवार घेऊन शत्रूशी लढतो, त्यांचा नि:पात करून प्रजेला संरक्षण देतो अशी त्यांची मन:स्थिती व्हायची.