पश्चिम आफ्रिकेतील नायजरच्या पश्चिम भागातील एका गावावर एका जिहादी संघटनेने मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात गावातील ४४ नागरिकांचा मृत्यू झाला. नायजरच्या गृहमंत्रालयाने ही माहिती दिली. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, शुक्रवारी दुपारी माली आणि बुर्किना फासोच्या सीमेजवळील कोकोरो ग्रामीण भागातील फाम्बिता गावात हा हल्ला झाला. गृहमंत्रालयाने या हल्ल्यासाठी ‘इस्लामिक स्टेट इन ग्रेट सहारा’ला (EIGS) जबाबदार धरले.
२१ मार्च रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास, जेव्हा मुस्लिम भाविक शुक्रवारची नमाज अदा करत होते, तेव्हा सशस्त्र दहशतवाद्यांनी संबंधित मशिदीला वेढा घातला आणि हे हत्याकांड घडवून आणले,” असे गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले. हल्लेखोरांनी तेथून निघण्यापूर्वी एक बाजारपेठ आणि घरेही पेटवून दिल्याचे त्यात म्हटले आहे. या हल्ल्याप्रकरणी ‘इस्लामिक स्टेट इन ग्रेट सहारा’शी काहीही संवाद झाले नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
चंदीगडमध्ये हल्ला झालेला ग्रेनेड ‘पाकिस्तानी’
दक्षिण कोरियातील २० हून अधिक जंगलांमध्ये आग!
भाजपसोबत कोणतेही मतभेद नाहीत, पक्षाध्यक्षांची निवड लवकरच
कंगाल पाकिस्तानमध्ये मंत्र्यांच्या पगारात १८८% वाढ
४४ नागरिकांच्या हत्येनंतर सरकारने ३ दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. मंत्रालयाने सांगितले की, तूर्तास मृत्यूची संख्या किमान ४४ आहे, तर १३ जण गंभीर जखमी आहेत. मंत्रालयाने तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. दरम्यान, नायजरसह शेजारी देश शेजारी बुर्किना फासो आणि माली गेल्या एका दशकाहून अधिक काळ जिहादी गटांनी चालवलेल्या बंडखोरीशी झुंजत आहे. त्यापैकी काही संघटना अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट गटाशी संलग्न आहेत. याआधीही त्याने असे हल्ले अनेक वेळा केले आहेत.