अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांच्या मदतनीसाच्या नोकराच्या घरी धाड टाकत तब्बल ३४.२३ कोटी रुपये इतकी रोकड जप्त केली होती.यानंतर या दोघांना अटक करण्यात आली आहे.संजीव लाल असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे जो झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांचा पीए आहे आणि जहांगीर हा संजीव लाल याचा नोकर आहे, यालाही अटक करण्यात आली आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेने सांगितले की, या दोघांची रात्रभर चौकशी केल्यानंतर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार त्यांना अटक करण्यात आली आहे.मंत्री आलमगीर आलम यांनी कोणतेही चुकीचे काम केले नाही असे, चौकशीमध्ये या दोघांनी सांगितले आहे.दरम्यान, मंगळवारी(७ मे) या दोघांना न्यायालयात हजार केले जाणार आहे.
हे ही वाचा:
सलमान खान गोळीबार प्रकरणी पाचवा आरोपी राजस्थानमधून गजाआड
कसाबचे कौतुक करायचे असेल तर पाकिस्तानात जा!
‘लडकी हो तो पिटोगी, ही काँग्रेसची घोषणा’
विजयपुरा ऑनर किलिंग प्रकरणः हिंदू मुलाशी लग्न केल्याप्रकरणी गर्भवती मुस्लिम महिलेला पेटवून दिले!
दरम्यान, ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरावर धाड टाकत ईडीने सोमवारी(६ मे) मोठी रक्कम जप्त केली होती.तब्बल ३४.२३ कोटी रुपये इतकी रोकड जप्त करण्यात आली होती.या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती.मंत्र्याच्या खासगी सचिवाच्या नोकराच्या घरी एवढी मोठी रोकड सापडल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.या प्रकरणी आता मंत्र्याच्या पीएला आणि पीएच्या नोकराला अटक करण्यात आले आहे.