झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक!

तपासात सहकार्य न केल्यामुळे अटक केल्याची माहिती

झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक!

झारखंडचे विकास मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज बुधवारी (१५ मे) अटक केली आहे.चौकशीदरम्यान सहकार्य न केल्याचा आरोप आलमगीर आलम यांच्यावर आरोप आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तपासात सहकार्य न केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.

मंत्री आलमगीर आलम यांच्या सचिवाच्या नोकराच्या घरातून ३७ कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्यानंतर मंत्री चर्चेत आले.या प्रकरणी मंत्र्यांच्या पीएला आणि त्याच्या नोकराला अटक करण्यात आली होती.यानंतर या प्रकरणाच्या चौकशीकरीता ईडीने मंत्री आलम यांना १२ मे रोजी समन्स बजावून १४ मे रोजी चौकशीसाठी रांची येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते.

हे ही वाचा:

“सरकार आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांचं व्हिजन तयार”

उबाठाच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे कसे काय?

‘वीर सावरकरांची निंदा करणाऱ्यांना नकली शिवसेनेकडून डोक्यावर घेऊन नाचण्याचे काम’

राहुल गांधी यांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ!

ईडीच्या आदेशानुसार मंत्री काल(१४ मे) रांची येथील ईडीच्या कार्यालयात हजर झाले.मिळालेल्या माहितीनुसार त्यांची तब्बल १० तास चौकशी करण्यात आली.त्यानंतर पुन्हा त्यांना आज चौकशीसाठी बोलावण्यात आले.मात्र, चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याने मंत्री आलमगीर आलम ईडीने अटक केली आहे.

६ मे रोजी ईडीने मंत्री आलमगीर यांचे पर्सनल सेक्रेटरी संजीव लाल यांच्या घरगुती नोकराच्या घरावर छापा टाकला होता.जहांगीर आलम असे नोकराचे नाव असून ईडीने छापा टाकत त्याच्या घरातून तब्बल ३७ कोटींहून अधिक रुपयांची रोकडं जप्त केली होती.तसेच ईडीने नोकराच्या घरातून काही दागिनेही जप्त केले होते.यानंतर संजीव लाल आणि जहांगीर आलम या दोघांना अटक केली होती.या प्रकरणी आता मंत्री आलमगीर यांनाही अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version