झारखंड: हेमंत सोरेन यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी!

होतवार तुरुंगात काढावी लागणार एक रात्र

झारखंड: हेमंत सोरेन यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी!

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर आता त्यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.यापूर्वी हेमंत सोरेन यांना रिमांडवर घेण्याची मागणी ईडीकडून करण्यात आली होती.ईडीच्या मागणीवरून न्यायालयात वाद झाला होता.वादावादीनंतर न्यायालयाने हेमंत सोरेनला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस कोठडीच्या मुद्द्यावर उद्या पुन्हा वाद होणार आहे.

दुपारी ४.१५ च्या सुमारास न्यायालयाने माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. या निर्णयानंतर हेमंत सोरेन यांची रांची येथील होतवार तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत सोरेन यांना होतवार कारागृहाच्या वरच्या डिव्हिजन सेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.उद्या शुक्रवारी (२ जानेवारी) पोलिस कोठडीसाठी न्यायालयात आणखी वाद होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींना पहिला ‘शिवसन्मान पुरस्कार’ जाहीर

पेपरफुटी रोखणारे विधेयक सोमवारी संसदेत सादर होणार

यंदाचा अर्थसंकल्प भारताच्या विकासाचा पाया मजूबत करेल

तीन कोटी महिला बनणार ‘लखपती दीदी’

याआधी गुरुवार १ जानेवारी रोजी दुपारी हेमंत सोरेन दुपारी अडीच वाजता विशेष ईडी न्यायालयात पोहोचले, त्यानंतर सुनावणी सुरू झाली.सुमारे २ तास दोन्ही बाजूंनी आपले म्हणणे न्यायालयासमोर मांडले.या दरम्यान दोन्ही पक्षांमध्ये जोरदार वादावादी झाली.

या युक्तिवादात ईडीने कोर्टाकडे १० दिवसांची कोठडी मागितली होती.न्यायालयात बचाव पक्षाच्या वतीने प्रदीर्घ चर्चा झाली, त्यानंतर न्यायालयाने हेमंत सोरेनला रिमांडवर पाठवण्याचा निर्णय राखून ठेवला.न्यायालयाच्या निर्णयानुसार हेमंत सोरेन यांना होतवार तुरुंगात एक रात्र काढावी लागणार आहे.

 

Exit mobile version