हेमंत सोरेन यांनी सपत्नीक घेतले नरेंद्र मोदींचे आशीर्वाद!

राहुल गांधी, प्रियांका गांधींचीही घेतली भेट

हेमंत सोरेन यांनी सपत्नीक घेतले नरेंद्र मोदींचे आशीर्वाद!
झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) झारखंडमध्ये पुन्हा एकदा युतीचे सरकार स्थापन करणार आहे. झामुमोच्या विजयानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन पत्नी कल्पना सोरेनसोबत दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज (२६ नोव्हेंबर) त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी हेमंत आणि त्यांची पत्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी संसद भवनात पोहोचले होते. या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेएमएमने ८१ पैकी ३४ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने २१, आजसूने एक, लोजपा रामविलासने एक, झारखंड लोकतांत्रिक क्रांतीकारी मोर्चा एक आणि जनता दल युनायटेडने एक जागा जिंकली आहे.
हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, तुम्हा सर्वांना नमस्कार. येत्या काही दिवसांतही बैठका होणार आहेत, अनेक गोष्टी आहेत. आम्हाला आमचे सरकार बनवायचे आहे. आम्ही येथे  आशीर्वादासाठी आलो आहोत, असे हेमंत सोरेन यांनी सांगितले. तत्पूर्वी, हेमंत सोरेन आणि त्यांच्या पत्नी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले, याठिकाणी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचीही भेट घेतली.
हे ही वाचा : 
नवी मुंबईत १८ चाकी ट्रेलर चोरीला
संसदेतील कार्यक्रमात काँग्रेसच्या राजकुमारांचा अहंकार दिसला
Exit mobile version