झारखंड: सर्व आरोपी अटक, स्पॅनिश जोडपे निघाले नेपाळला!

झारखंड उच्च न्यायालयात ७ मार्च रोजी होणार सुनावणी

झारखंड: सर्व आरोपी अटक, स्पॅनिश जोडपे निघाले नेपाळला!

झारखंडमधील दुमका जिल्ह्यात एका स्पॅनिश महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणी आणखी पाच जणांना अटक करण्यात आली असून अटक केलेल्यांची एकूण संख्या आता आठ झाली आहे.दरम्यान, हे जोडपे आता नेपाळला जाण्यासाठी रवाना झाले आहेत.झारखंड पोलीस या जोडप्याला बिहार सीमेवर नेतील तेथून पुढे बिहार पोलीस त्यांना नेपाळ पोहचण्यास मदत करतील.

१ मार्च रोजी २८ वर्षीय स्पॅनिश पर्यटक महिलेवर रांचीपासून ३०० किमी अंतरावर असेलल्या कुरुमहाट भागात सामूहिक बलात्कार झाला.ही महिला तिच्या पतीसोबत एके ठिकाणी तंबू उभारून झोपली असताना ही दुर्घटना घडली.या प्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हे ही वाचा :

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना आता भूमिपूजनाची अडचण

पंजाब: काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू यांना पोलिसांकडून अटक!

‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यास ऑल्ट न्यूजच्या मोहम्मद झुबेरकडून संरक्षण

वीर सावरकरांवर का बनवला चित्रपट?

स्पॅनिश महिलेने तिच्या एफआयआरमध्ये सात जणांचा सहभाग असल्याचे म्हटले होते.हे जोडपे परदेशातून टुरिस्ट व्हिसावर भारतात आले होते. हे लोक स्पेनच्या आधी पाकिस्तानात गेले. त्यानंतर पाकिस्तानातून बांगलादेश आणि नंतर बांगलादेशमार्गे झारखंडमधील दुमका येथे पोहोचले.हे जोडपे दुमका येथील हंसदिहा पोलीस स्टेशन हद्दीतील कुंजी गावात तंबूत थांबले होते. दोघांना झारखंडमधून नेपाळला जायचे होते.त्यादरम्यान रात्री ही दुर्घटना घडली.

या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.दरम्यान, हे जोडपे आता नेपाळला रवाना झाले आहेत.या जोडप्याला झारखंड पोलीस दुमका सर्किट हाऊस येथून बिहार सीमेवर नेतील.यानंतर बिहार पोलीस त्यांना त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी नेपाळला पोहचण्यास मदत करतील.तसेच दुमका जिल्हा प्रशासनाने नुकसानभरपाई म्हणून त्या महिलेस १० लाख रुपयांची तरतूद केली आहे.आतापर्यंत या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले आहे.झारखंड उच्च न्यायालयात ७ मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Exit mobile version