झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान बुधवारी (१३ नोव्हेंबर) शांततेत पार पडले. पहिल्या फेरीत राज्यातील १५ जिल्ह्यांतील ४३ विधानसभा जागांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले. सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार ४३ जागांवर ६४.९५ टक्के मतदान झाले आहे.
२०१९ ची आकडेवारी पाहता यंदा एका टक्क्याची वाढ झाली आहे. त्यावेळी ६३.७५ टक्के इतके मतदान झाले होते. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून अंतिम आकडेवारी जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ असू शकते.
पहिल्या टप्प्यातील मतदानाबरोबरच या टप्प्यातील सर्व ६८३ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन, आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता, राज्यसभा खासदार महुआ माझी, माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या पत्नी गीता कोडा आणि माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांची सून पूर्णिमा दास यांचे भवितव्य एव्हिएममध्ये कैद झाले आहे.
हे ही वाचा :
जोगेश्वरीत उबाठा उमेदवार अनंत (बाळा) नर कडून गुंडगिरी, महिलांचा विनयभंग!
कोविडकाळात घरात बसणारे उद्धव ठाकरे हे देशातील एकमेव मुख्यमंत्री
मतपेढीचे, जातीचे राजकारण करणा-यांना थारा देऊ नका
अनिल देशमुखांना क्लीन चीट नाही; फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न
दरम्यान, पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडले असून दुसऱ्या टप्प्यासाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यानंतर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या सुमारे २.६ कोटी मतदार आहेत.