मोदींकडून ‘संकल्प पत्रा’ची पहिली प्रत स्वीकारणारे रामवीर कृतकृत्य झाले!

पंतप्रधान मोदींच्या भेटीचा शेतकऱ्याने सांगितला अनुभव

मोदींकडून ‘संकल्प पत्रा’ची पहिली प्रत स्वीकारणारे रामवीर कृतकृत्य झाले!

भाजपने आज आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला.भाजपने आपल्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा केल्या.दरम्यान, हरियाणातील झज्जर येथील पान केशो सिलानी गावातील शेतकरी रामवीर चहर यांना भाजपच्या निवडणूक संकल्प पत्राची पहिली प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिळाली.पंतप्रधानांच्या हस्ते संकल्प पत्राची प्रत मिळवणारे रामवीर हे एकमेव शेतकरी आहेत.पंतप्रधान मोदींना भेटून रामवीर आनंदी आहेत.पंतप्रधानांना भेटणे हे स्वप्नापेक्षा कमी नसल्याचे शेतकरी रामवीर म्हणाले आहेत.

रामवीर यांनी आज(१४ एप्रिल) दिल्लीतील भाजप पक्ष कार्यालयात पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी रामवीर यांना विचारले, कसे आहात? कुटुंबातील सर्वजण कसे आहेत? यावर रामवीर म्हणाले की, सर्वजण आनंदी आहेत. यानंतर पंतप्रधानांनी विचारले तुम्ही कोठून आहात? यावर रामवीर सांगितले की, हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील सिलानी गावातील आहे.यानंतर पंतप्रधानांनी विचारले की, सरकारच्या योजनांचा लाभ मिळत आहे की नाही?. यावर योजनांचा लाभ मिळत असल्याचे रामवीर यांनी सांगितले.

हे ही वाचा:

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ म्हणतो, मी झाडली सलमानच्या घरावर गोळी!

इंडी आघाडीचा जाहीरनामा देशाला दिवाळखोर बनवणारा

विम्याच्या पैशांसाठी फारुकने कुटुंबाच्या साथीने केली मानसिकदृष्ट्या विकलांगाची हत्या

बेंगळुरू स्फोटातील आरोपी अब्दुल ताहा बनला विघ्नेश आणि अनमोल कुलकर्णी

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर रामवीर म्हणाले की, आतापर्यंत पंतप्रधान मोदींना केवळ फक्त टीव्हीवर, मोठ्या पडद्यावर आणि रेवाडीतील रॅलीमध्ये पाहिले होते.मात्र, आज पंतप्रधान मोदी माझ्यासमोर होते.हे पहिल्यांदाच घडले. त्यांच्या भेटीने मी स्वतःला भाग्यवान समजतो. तसेच पंतप्रधानांनीही माझ्या खांद्यावर हात देखील ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

रामवीर पुढे म्हणाले की, मला शनिवारी(१३ एप्रिल) भाजप कार्यालयातून पांडेजींचा फोन आला होता.त्यांनी सांगितले की, उद्या तुम्हाला दिल्लीतील भाजप कार्यालयात यावे लागणार असून तुमची पंतप्रधानांसोबत भेट होणार आहे.रामवीर म्हणाले की माझा यावर विश्वास बसत नाही आणि तुम्हाला माझा नंबर कुठून मिळाला, असे विचारले असता तेव्हा फोनवरून त्यांनी मला सांगितले की, तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळतो, तिथूनच तुमचा नंबर मिळाला.

Exit mobile version