22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषज्यू अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांचा अमेरिकेतील पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनाशी संबंध!

ज्यू अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांचा अमेरिकेतील पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनाशी संबंध!

कोलंबिया विद्यापीठात सुरू झालेले निदर्शनांमध्ये वाढ

Google News Follow

Related

डाव्या विचारांचे लोकहितकर्ते, अब्जाधीश ज्युइश जॉर्ज सोरोस आणि त्यांनी वित्तपुरवठा केलेल्या संघटना अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या देशव्यापी पॅलेस्टिनी समर्थक आंदोलनांना प्रोत्साहन देत आहेत.गेल्या आठवड्यात कोलंबिया विद्यापीठात सुरू झालेले निदर्शनाचे लोण आठपेक्षा जास्त राज्यांतील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये पसरले आहे.

कोलंबिया, हार्वर्ड, येल, कॅलिफोर्नियामधील बर्कले, ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी आणि जॉर्जियामधील एमोरी यासह एकामागून एक विद्यापीठांमध्ये ‘लिबरेटेड झोन’ नावाच्या कॅम्प साइट्स उदयास आल्या – हे सर्व जॉर्ज सोरोस-अनुदानित स्टुडंट्स फॉर जस्टिस इन पॅलेस्टाइन्स (एसजेपी) संस्थेच्या शाखांनी आयोजित केल्याचे वृत्त द न्यूयॉर्क पोस्टने दिले आहे. एसजेपीला स्वयंसेवी संस्थांच्या नेटवर्कद्वारे अर्थसाह्य केले जाते. या संस्थेला ‘बँक ऑफ इंग्लंडला अस्थिर करणारा माणूस’ म्हणून ओळखले जाणारे अब्जाधीश सोरोस यांनी निधी दिला आहे.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, तीन विद्यापीठांमध्ये, जॉर्ज सोरोस यांच्या ‘यूएस कॅम्पेन फॉर पॅलेस्टिनियन राइट्स’ (यूएससीएफपीआर) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे ‘फेलो’ असलेल्या पगारी कार्यकर्त्यांद्वारे आंदोलनाला उत्तेजन दिले जात आहे. मात्र वॉशिंग्टन टाइम्सच्या विश्लेषणाने या वृत्तावर आक्षेप घेतला आहे. ‘सोरोसच्या ओपन सोसायटी फाउंडेशन्स (ओएसएफ)कडून मिळणारा निधी आणि होणारी निदर्शने यांच्यातील संबंध इतका क्षुल्लक आहे की स्पष्टपणे काल्पनिक आहे,’ अशी टीका या वृत्तात करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

“विरोधकांकडे सर्वच इंजिन; डब्बे लावायला कोणी तयार नाही”

सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडण्यापूर्वी आरोपींकडून बिहारमध्ये सराव

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ९९ हजार १५० मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी

भारत आत्मनिर्भर; चीनमधून खेळण्यांची आयात ७० टक्क्यांनी घटली

यूएससीपीआर आपल्या समुदाय-आधारित फेलोंना सुमारे सात हजार ८०० अमेरिकी डॉलर देते आणि ‘पॅलेस्टिनी संघटनांच्या नेतृत्वाखालील मोहिमा’ आयोजित करण्यासाठी आठवड्यातून आठ तासांच्या बदल्यात दोन हजार ८८० अमेरिकी डॉलर आणि तीन हजार ६६० अमेरिकी डॉलर कॅम्पस-आधारित फेलोंना देते. त्यांना क्रांती करण्यासाठी, आवाज उठवण्यासाठी प्रशिक्षित केले जाते, असे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

एसजेपी संस्थेला सन २०१७पासून सोरोस यांच्या ओपन सोसायटी फाउंडेशनकडून किमान तीन लाख अमेरिकी डॉलर मिळाले आहेत. तर, न्यूयॉर्क टाइम्स पोस्टनुसार, सन २०१९सून रॉकफेलर ब्रदर्स फंडातून तीन लाख ५५ हजार अमेरिकी डॉलरही मिळाले आहेत.

पॅलेस्टाईनमधील बर्कले लॉ स्टुडंट्स फॉर जस्टिसचे सह-अध्यक्ष मलाक अफानेह यांनी या आठवड्यात कॅम्पसमध्ये अनेक इस्रायलविरोधी आंदोलनांना संबोधित केले. जवळपास तीन संस्थांना सोरोसशी संबंधित गटांनी पैसे दिले होते. एसजेपीने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याला ‘ऐतिहासिक विजय’ असे म्हटले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा