महाराष्ट्रात सुरू असलेले पावसाचे थैमान लक्षात घेता केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. जेईई मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सवलत देण्यात आलेली आहे. या वादळी पावसामुळे आणि अनेक ठिकाणी झालेल्या दरड कोसळण्याच्या दुर्घटनांमुळे जे विद्यार्थी जेईई मुख्य परीक्षेच्या तिसऱ्या सत्राला पोहोचू शकणार नाहीत त्यांना आणखीन एक संधी देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.
केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी तशी विनंती या परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी या संस्थेला केली आहे. प्रधान यांनी ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली असून विद्यार्थ्यांनी काळजी करू नये असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
हे ही वाचा:
भारताने ‘ही’ मदत पाठवल्यामुळे बांग्लादेशने सोडला सुटकेचा निश्वास
मीराबाई चानूने रौप्य पदक उचलले
एरोटीका म्हणजे पॉर्न नाही…माझे पती निर्दोष
२५ आणि २७ जुलै रोजी १२ वी नंतरच्या इंजिनियरिंगच्या प्रवेशासाठी महत्वाची असणारी जेईई मुख्य परीक्षेचे तिसरे सत्र होणार आहे. पण महाराष्ट्रात सध्या जो पावसाचा हाहाकार माजला आहे त्यामुळे या अनेक ठिकाणी या परिक्षेसाठी अडचणी येऊ शकतात. अनेक ठिकाणी दळणवळण ठप्प झाले आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे मुश्कील होणार आहे. तर कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये तर परिक्षा केंद्रही सुरु असण्याची शक्यता नाही.
त्यामुळेच कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा येथील जेईईचे विद्यार्थी जर परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत तर त्यांची पुनर्परीक्षा घेण्यात येणार असल्याचे प्रधान यांनी सांगितले आहे. तर त्याचवेळी विद्यार्थ्यांनी पॅनिक होऊ नये असे धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Students from Kolhapur, Palghar, Ratnagiri, Raigadh, Sindhudurg, Sangli, & Satara, who are unable to reach their test centres on 25 & 27 July 2021 for JEE (Main)-2021 Session 3 need not panic. They will be given another opportunity,and the dates will be announced soon by the NTA.
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) July 24, 2021