देशातील कोविडची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे अनेक परिक्षांच्या वेळापत्रकात बदल करावा लागला आहे. त्यानुसार जेईई या महत्त्वाच्या परिक्षेच्या वेळापत्रकात देखील सरकारने बदल केला आहे आणि ही परिक्षा कोविडमुळे पुढे ढकलली आहे. या नव्या तारख्या अजून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.
जेईई मुख्य २०२१ परिक्षा ३ जून रोजी घेण्यात येणार होती. या वर्षी जेईईचे चार टप्पे घेण्यात येणार होते, त्यापैकी केवळ दोनच टप्पे घेतले गेले आहेत. त्याबरोबरच या वर्षी जेईई परिक्षेस बसण्याच्या मर्यादा देखील वाढविण्यात आल्या आहेत. कोविडच्या दुसऱ्या लाटेने परिक्षेला लांबणीवर टाकले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात होणारे जेईईचे दोन टप्पे पुढे ढकलण्यात आले आहेत. हे दोन्ही टप्पे जून किंवा ऑगस्ट महिन्यात घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
हे ही वाचा:
३८ वर्षांनी कल्याणकर घेणार मोकळा श्वास
ठाकरे सरकार दोन तोंडांनी बोलतय
अनेक महिने महाराष्ट्रात लॉकडाऊन ठेवणार का?
शिवसेना नेत्याने लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवले
जेईई ही परिक्षांमधील गुणांचा वापर अनेक प्रकारच्या ज्ञानशाखांमधील अभ्यासक्रमासाठी केला जातो. आयआयटीशिवाय इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयआयएसईआर), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी (आयआयएसटी), राजीव गांधी इन्स्टिट्युट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी (आरजीआयपीटी), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी यांसारख्या संस्थांमधील प्रवेशांसाठी देखील जेईईमधील गुण वापरले जातात.
याशिवाय आयआयटीमधील प्रवेशासाठीच्या एकूण अटींमध्ये शिथीलता आणण्यात आली आहे. पूर्वी जेईईमधील गुणांसोबतच बारावीच्या परिक्षेत ७५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक होते. यंदा बारावीच्या परिक्षेतील गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे.