लोकसभेच्या निकालानंतर देशात तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे.एनडीएचा प्रमुख नेता म्हणून सर्व एनडीएतील सदस्यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिल्यानंतर मोदी ९ जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. तशी तयारी देखील सुरु करण्यात आली आहे.दरम्यान, एनडीएचा प्रमुख सहयोगी जनता दलाने (युनायटेड) ‘एक राष्ट्र, एक मतदान’ ला पाठिंबा दिला असून समान नागरी कायद्यालाही सहमती दर्शविली आहे.परंतु, अग्निवीर योजनेवर नव्या पद्धतीने विचार करण्याची गरज असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.जेडीयूचे ज्येष्ठ नेते केसी त्यागी हे वक्तव्य केले आहे.
दिल्लीमध्ये काल (५ जून) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बोलाविलेल्या बैठकीनंतर जेडीयूचे ज्येष्ठ नेते केसी त्यागी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि आपल्या पक्षाची भूमिका मांडली.ते म्हणाले की, “अग्नीवीर योजनेमुळे मतदारांचा एक वर्ग नाराज आहे. ज्या उणिवांवर जनतेने प्रश्न विचारला आहे, त्यांची सविस्तर चर्चा करून ती दूर व्हावीत अशी आमची पक्षाची इच्छा आहे.”
हे ही वाचा:
मै नरेंद्र दामोदरदास मोदी… ९ जून रोजी सायंकाळी तिसऱ्यांदा गुंजणार आवाज!
रोहित, हार्दिकच्या खेळीमुळे आयर्लंडवर सफाईदार विजय!
एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार
युगांडाच्या ४३ वर्षीय गोलंदाजाने पहिल्याच वर्ल्डकपमध्ये केला विश्वविक्रम
वन नेशन वन इलेक्शनवर बोलताना ते म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणावर पक्षाच्या भूमिकेबद्दल कायदा आयोगाच्या प्रमुखांना पत्र लिहिले आहे. “आम्ही याच्या विरोधात नाही पण सर्व संबंधितांशी चर्चा करून तोडगा काढला पाहिजे,” असे त्यागी म्हणाले.
जातीनिहाय जनगणनेवर जोर देत केसी त्यागी म्हणाले की, “देशातील कोणत्याही पक्षाने जातीनिहाय जनगणनेला नाही म्हटलेले नाही.पंतप्रधानांनीही सर्वपक्षीय शिष्टमंडळात याला विरोध केला नाही.जातीनिहाय जनगणना ही काळाची गरज आहे. आम्ही त्याचा पाठपुरावा करू,” असे त्यागी म्हणाले.