चाळीसपेक्षा अधिक सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना मिळणार ही घसघशीत वाढ

चाळीसपेक्षा अधिक सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना मिळणार ही घसघशीत वाढ

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्थानिक क्रिकेटपटूंची मॅच फी म्हणजेच सामन्यानंतर मिळणारे मानधन वाढवण्याचा निर्णय झाहीर केला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सोमवारी (२० सप्टेंबर) ट्विटकरून बीसीसीआयकडून स्थानिक क्रिकेटपटूंना मिळणारी रक्कम वाढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

जय शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार ४० हून अधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंना ६० हजार रुपये, २३ वर्षांखालील खेळाडूंना २५ हजार आणि १९ वर्षांखालील खेळाडूंना २० हजार इतकी रक्कम बोर्ड मॅच फी म्हणून देणार आहे.

२०१९- २० या वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे स्थानिक सामने रद्द झाले होते. त्यामुळे स्थानिक क्रिकेटपटूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे स्थगित झालेल्या सीजनची भरपाई म्हणून २०२०- २१ मध्ये मॅच फीमध्ये ५० टक्के वाढ दिली जाणार आहे. जय शाह यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘स्थानिक क्रिकेटपटूंच्या सामन्यानंतर मिळणाऱ्या रकमेत वाढ झाल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. वरिष्ठ- ६० हजार रुपये (४० सामन्यांहून अधिक), २३ वर्षाखालील- २५ हजार रुपये, १९ वर्षाखालील- २० हजार रुपये’

बीसीसीआने दिलेल्या माहितीनुसार २०२१- २२ या वर्षात सर्व वयांतील खेळाडूंचे मिळून २ हजार १२७ सामने खेळवले जाणार आहेत. रणजी ट्रॉफीची स्पर्धा ही सर्वाधिक काळ चालू चालणार आहे. तीन महिने चालणारी ही स्पर्धा झाल्यानंतर एक महिना विजय हजारे ट्रॉफीची स्पर्धा चालेल.

हे ही वाचा:

कम्युनिस्टांनाही कळले, कट्टर इस्लामी संघटना करत आहेत शिक्षित महिलांना लक्ष्य!

बाप्पाला निरोप देण्यासाठी बर्लिनमध्येही वाजले ढोल ताशे

विद्यापीठाला नाव देण्यात आलेले राजा महेंद्र प्रताप सिंह कोण आहेत? वाचा सविस्तर

‘टेटेपटू मनिका बात्राला का वगळले त्याची कारणे द्या!’

स्पर्धांचे वेळापत्रक

स्थानिक क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले असले तरी सोळा वर्षांखालील खेळाडूंच्या स्पर्धा खेळवण्याबाबत अजून ठोस निर्णय झालेला नाही. कोरोना प्रतिबंधक लस अजूनही १८ वर्षाखालील मुलांना उपलब्ध नसल्याने खेळाडूंच्या प्रकृतीची काळजी लक्षात घेता ही स्पर्धा होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Exit mobile version