माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांच्या मदतीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मदतीचा हात पुढे केला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी कर्करोगाशी लढा देत असलेल्या माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाडसाठी १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. अंशुमन गायकवाड यांच्या उपचाराकरीता माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी बीसीसीआयकडे मदतीची मागणी केली होती. कपिल देव यांच्या मागणीनंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी क्रिकेटपटूला मदत करण्याचे बीसीसीआयला निर्देश दिले आहेत.
कॅन्सरशी झुंज देत असलेल्या भारताचा माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांनी बीसीसीआयकडे मदतीची विनंती केली होती. तसेच कपिल देव यांनी गायकवाड यांच्या उपचारासाठी आपली पेन्शन दान करण्याचे आश्वासन देखील दिले होते. अखेर बीसीसीआयने कपिल देव यांच्या मागणीची दखल घेतली आहे.
हे ही वाचा:
तब्बल ४६ वर्षानंतर जगन्नाथ पुरी मंदिराचा खजिना उघडला !
आजारी म्हणून जामीन मिळवलेल्या लालूंची लग्नसमारंभात हजेरी
विशाळ गडावरील अतिक्रमण हटवून ऐतिहासिकपणा जपण्याची शासनाचीही भूमिका!
सुरतच्या हिरे कारागिरांची कमाल, आठ कॅरेटच्या हिऱ्यावर पंतप्रधान मोदींची प्रतिमा !
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी कर्करोगाशी लढा देत असलेल्या माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाडसाठी १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. जय शाह यांनी तसे निर्देश बीसीसीआयला दिले आहेत. तत्पूर्वी जय शाह यांनी गायकवाड यांच्या कुटुंबीयांशीही बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आणि मदत घोषित केली.