सांगली जिल्ह्याने गमावला शूर सुपुत्र; रोमित चव्हाण शहीद

सांगली जिल्ह्याने गमावला शूर सुपुत्र; रोमित चव्हाण शहीद

जम्मू-काश्मीरमधील शोपियाँमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव येथील जवान रोमित तानाजी चव्हाण (वय २३) शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांशी लढा देत असताना जवान रोमित यांना वीरमरण आले.त्यामुळे सांगली जिल्हयात दुःखाचे वातावरण पसरले आहे.

एक दिवसापूर्वी चकमकीत शहीद झालेल्या रोमित यांचे पार्थिव आज पहाटे शिगाव येथे आणण्यात आले. दरम्यान, आज सकाळी शोकाकूल वातावरणात शहीद जवान रोमित चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. वीर रोमित यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. रविवारी ही बातमी समजताच शिगाव येथे गावकर्‍यांनी उत्स्फूर्तपणे सर्व व्यवहार बंद ठेवत रोमीतला अभिवादन केले होते.

शनिवारी सकाळी चेरामार्ग येथे दहशतवाद्यांना रोखताना झालेल्या गोळीबारात रोमित हे शहीद झाले. या घटनेचे वृत्त शनिवारी दुपारी गावात समजले. रोमित यांचे वडील वीरपिता तानाजी चव्हाण, वीरमाता तसेच रोमित यांच्या बहीण यांच्या सांत्वनासाठी अनेकांनी धाव घेतली आहे. याच दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने वारणाकाठी विशेष चबुतरा उभारला होता. आज सकाळी शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

हे ही वाचा:

मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाचा प्रश्न ‘केंद्र’स्थानी

न्यायालयाच्या बाहेर वाहनांमध्ये बसून नोटरी व्यवसाय नको!

मिठागराच्या जमिनीवर सेना आमदार उभारणार थीम पार्क?

तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना का भेटत आहेत?

मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या रोमितची भारतीय सैन्य दलात भरती होण्याची मनापासूनची इच्छा होती.रोमितचे वडील तानाजी चव्हाण हे राजारामबापू पाटील साखर कारखाना येथे कार्यरत आहेत तर आई गृहिणी आहे आणि बहीण शिक्षण घेत आहे. वयाच्या अठराव्या वर्षी रोमित भारतीय सैन्य दलात भरती झाला होता. अवघ्या पाच वर्षाच्या भारत मातेच्या देशसेवेत आपले प्राण देशाच्या संरक्षणासाठी दिले आहेत.

Exit mobile version