जम्मू-काश्मीरच्या कठुआत चकमक, एक जवान हुतात्मा!

सैन्याने दोन दहशतवादी टिपले

जम्मू-काश्मीरच्या कठुआत चकमक, एक जवान हुतात्मा!

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला आहे.जम्मू काश्मीरमधील दोडा आणि कठुआ ठिकाणी दहशतवाद्यांनी मंगळवारी ( ११ जून) रात्री अचानकपणे हल्ला चढवत गोळीबार केला.या हल्ल्यात एक सीआरपीएफ जवानाला वीरमरण आले असून अन्य सहा सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान, दोन्ही भागात अजूनही चकमक सुरु आहे.

कठुआच्या सैदा सुखल गावात मंगळवारी संध्याकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक नागरिक देखील जखमी झाला आहे.भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.या चकमकीत सैन्याने दोन दहशतवादी टिपले.तर सीमेपलीकडून घुसखोरी केलेल्या अन्य दहशतवाद्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

हे ही वाचा:

डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये पुन्हा अग्नितांडव!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वीकारला पदभार; जुलैमध्ये सातव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प

हिंदू यात्रेकरूंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज राज्यभर आंदोलन

अठराव्या लोकसभेचे विशेष अधिवेशन २४ जूनपासून

दरम्यान, पहाटे ३ च्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला.हा हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) जवान कबीर दास गंभीर जखमी झाला. जखमी जवानाला रुग्णालयात हलवण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, सैदा सुखलमधील सुरक्षा घेरा तोडण्यासाठी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.या गोळीबारात एक जवानाला वीरमरण आले.दरम्यान, परिसरात नाकाबंदी लावण्यात आली असून सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरु आहे.दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील प्रत्येक घराची तपासणी केली जात आहे.

 

Exit mobile version