छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. स्फोटकांचा धक्का बसल्याने सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना नारायणपूर जिल्ह्यातील कोहकामेता पोलिस स्टेशन परिसरातील बेदमाकोटी गावाजवळ शुक्रवारी (२८ मार्च) सकाळी १० वाजता घडली. अधिकाऱ्याने पुढे सागितले की, इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (ITBP), डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (DRG) आणि बस्तर फायटर्सची संयुक्त टीम कुतुल आणि बेदमाकोटी येथील कॅम्प दरम्यान गस्त घालण्यासाठी पाठवण्यात आली होती आणि याच दरम्यान ही दुर्घटना घडली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुतुल गावापासून बेदमाकोटी गावाकडे सुमारे १.५ किमी अंतरावर गस्त घालत असताना, नक्षलवाद्यांनी एक भूसुरुंग स्फोट केला ज्यामध्ये बस्तर फायटर्सचा एक सैनिक जखमी झाला. जखमी सैनिकाला नारायणपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी सैनिकाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागात नक्षलवाद्यांविरुद्ध मोहीम सुरूच आहे.
हे ही वाचा :
म्यानमार आणि बँकॉकला भूकंपाचा धक्का, भारताकडून मदतीचे आश्वासन!
ग्रेटर नोएडात मुलींच्या वसतिगृहाला आग, विद्यार्थिनींनी मारल्या इमारतीवरून उड्या
आरोग्यासाठी वरदान: जांभळाच्या बियांचे चूर्ण
“आरोग्यासाठी वरदान आहे त्रिफळा, पचनशक्तीपासून रोगप्रतिकारक शक्तीपर्यंत लाभदायक”
दुसरीकडे, पोलिस त्या भागात शोध मोहीम राबवत आहेत. या भागात अलिकडेच सुरक्षा दलाची एक छावणी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे नक्षलवादी दहशतीच्या स्थितीत आहेत. नक्षलवाद्यांवर सतत कारवाई केली जात आहे, त्यामुळे नक्षलवादी निराश झाले आहेत. नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भागात सुरक्षा दल घुसून त्यांच्यावर हल्ले करत आहेत.