महिलेच्या केसात थुंकणाऱ्या जावेद हबीबचा माफीनामा

महिलेच्या केसात थुंकणाऱ्या जावेद हबीबचा माफीनामा

प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब हा गेले दोन दिवस वादाच्या भोव-यात सापडला होता. आपल्या एका वर्कशॉप दरम्यान एका महिलेचे केस कापताना पाणी नाही म्हणून तिच्या केसात थुंकल्याची घटना पुढे आली होती. समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जावेद हबीब विरोधात चांगलीच टीकेची झोड उठलेली पाहायला मिळाली.

पण आता या संपूर्ण प्रकरणात जावेद हबीब यांनी माफीनामा सादर केला आहे. ‘कुणाच्या जर भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो. माफ करा. मनापासून माफी मागतो’ असे म्हणत जावेद हबीबने एक व्हिडिओ संदेश पोस्ट केला आहे.

हे ही वाचा:

प्लास्टिक द्या आणि चहा, वडापाव घ्या!

‘हे तर पंजाबमधील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे लक्षण’

मुंबई पालिकेकडून गृह विलगीकरणासाठी नवी नियमावली जाहीर… वाचा सविस्तर

मिनी लॉकडाऊनचा निर्णय लवकरच

दरम्यान जावेद हबीबच्या या कृत्याची दखल थेट केंद्रीय महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे. केंद्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासंबंधीचे पत्रक महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी उत्तर प्रदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांना पाठवले आहे.

काय आहे प्रकरण?
हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब याचा एक सेमिनार सुरू होता. यामध्ये तो सहभागी झालेल्यांना एक प्रात्यक्षिक दाखवत होता. त्यासाठी त्याने प्रेक्षकांमधून एका महिलेला आमंत्रित केले आणि तिचे केस कापू लागला. यावेळी ‘तुमच्याकडे जर पाणी नसेल तर तुम्ही हे करू शकता’ असे म्हणत तो त्या महिलेच्या केसात थुंकला.

या संपूर्ण घटनेनंतर त्या महिलेने या प्रकरणी जावेद हबीबच्या विरोधात आक्षेप नोंदवला आहे. ‘मी कधीही जावेद हबीबच्या पार्लरमध्ये केस कापायला जाणार नाही’ असे म्हणत निषेध करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Exit mobile version