हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी जावेद अहमद मट्टू याला दिल्लीत अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुरुवारी त्याला पकडले. जम्मू-काश्मीरमधील अनेक हत्यांमध्ये त्याचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या डोक्यावर १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. इक्बाल अहमदने पाकिस्तानात जाऊन दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
दहशतवादी जावेद अहमद मट्टू हा उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला येथील सोपोरचा रहिवासी आहे. २००९ मध्ये त्याने दहशतवादाचा मार्ग निवडला. तो हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता. दहशतवादी जावेद हिजबुलच्या टॉप कमांडरमध्ये गणला जातो. सुरक्षा दलांनी हिजबुलचे बहुतांश कमांडर मारले आहेत. यामध्ये फक्त दोन टॉप कमांडर उरले आहेत, त्यापैकी एक पाकिस्तानात पळून गेला आहे आणि दुसरा हा जावेद मट्टू जो फरार होता.अखेर दहशतवादी जावेद अहमद मट्टूला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली असून त्याच्याकडून एक पिस्तूल, मॅगझिन आणि चोरीचे वाहन जप्त करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींविरोधात केलेले वक्तव्य काँग्रेस नेत्याला भोवणार!
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदी निवड!
चहाचा आस्वाद घेतल्यानंतर आता मोदींचे मीरा मांझींना पत्र!
२५० रुपये मोजा आणि शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवरून प्रवास करा!
दरम्यान,सुरक्षा एजन्सीच्या टॉप १० यादीत दहशतवादी जावेद अहमद मट्टूचाही समावेश असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे.तसेच गेल्या वर्षी, स्वातंत्र्य दिनाच्या आधी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.या व्हिडिओमध्ये अहमद मट्टूचा भाऊ रईस मट्टू सोपोरमधील त्याच्या घरी तिरंगा फडकवताना दिसत होता.