आनंद साजरा करण्यासाठी बुमराह परतला मायदेशी

नेपाळ विरुद्ध खेळणार नाही

आनंद साजरा करण्यासाठी बुमराह परतला मायदेशी

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा आशिया चषक २०२३ मधील काही सामन्यांमध्ये अनुपस्थित असणार आहे. आशिया चषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना पाकिस्तानासोबत झाला असून या सामन्यानंतर जसप्रीत बुमराह मायदेशी परतला आहे. मात्र, तो काही दिवसांत पुन्हा आशिया चषकासाठी संघात परतणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मायदेशी परतलेला बुमराह सोमवार, ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या नेपाळविरुद्धच्या सामन्यात दिसणार नाही. तर, तो थेट सुपर ४ च्या सामन्यासाठी संघात दाखल होणार आहे. काही वैयक्तिक कारणासाठी बुमराह भारतात परतल्याची माहिती आहे. जसप्रीत बुमराह आणि संजना गनेशन हे पालक बनले असून त्यासाठीच बुमराह भारतात परतला आहे. सोशल मीडियावर याबद्दल त्यांनी माहिती दिली असून त्यांनी आपल्या मुलाचे नाव अंगद ठेवले आहे.

जसप्रीत बुमराह हा गेले काही महिने पाठीच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर त्याने प्रदीर्घ विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. आशिया चषक आणि आगामी विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पुनरागमनाकडे लक्ष होते.

हे ही वाचा:

जालन्याचे पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर

अदानी-अंबानींना लक्ष्य करून देशाची घडी विस्कटण्याचा प्रयत्न

सेव्हन हिल्समध्ये गरीब रुग्णांना मोफत सेवा पुरवा!

लैंगिक अत्याचार करत ब्लॅकमेल करणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्याने केले ठार

बुमराहच्या मैदानावर पुनरागमनाची पहिली चाचणी आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत झाली, जिथे त्याने आपला विशेष खेळ दाखवून पहिल्याच षटकात दोन गडी बाद केले. त्यामुळे आशिया चषकासाठी संघात पुनरागमन करण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला. आता बुमराहच्या अनुपस्थितीत, भारताला मोहम्मद शमीचा पर्याय असणार आहे. मोहम्मद सिराजच्या जोडीने वेगवान गोलंदाजाची भूमिका शमी पार पडण्याची अपेक्षा आहे.

Exit mobile version