आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह याला ‘प्लेअर ऑफ द मंथ डिसेंबर २०२४’ चा पुरस्कार जाहीर झाला आहे. डिसेंबर २०२४ मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जसप्रीत बुमराह याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पॅट कमिन्स आणि डेन पॅटरसन यांना मागे टाकत त्याने या पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे.
तीन कसोटी सामन्यांमध्ये, बुमराहने १४..२ च्या सरासरीने २२ विकेट्स घेतल्या. बुमराह याने एकट्याने अनेकदा भारताच्या गोलंदाजीची सूत्रे हाती घेत यश मिळवून दिले. पहिल्या कसोटी सामन्यापासूनचं बुमराह याने उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ब्रिस्बेनमध्ये जबरदस्त कामगिरी करत पहिल्या डावात त्याच्या सहा विकेट्सने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा क्रम उद्ध्वस्त केला. बुमराहने दुसऱ्या डावात आणखी तीन विकेट्स घेत एकूण नऊ विकेट्सचा घेतल्या. त्याच्या प्रयत्नांमुळे पावसाने प्रभावित झालेला सामना अनिर्णित राहिला आणि भारताच्या मालिकेतील आशा जिवंत ठेवल्या.
A record-breaking performance in December earns a prolific pacer the ICC Men's Player of the Month award 🏅
More ⬇https://t.co/hJEvi7Ycwg pic.twitter.com/lQHGmxhDwS
— ICC (@ICC) January 14, 2025
पुढे मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीत बुमराहने आणखी एक उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याने दुसऱ्या डावात पाच गडी बाद केले. भारताने मालिका गमावली असली तरी बुमराह हा भारतासाठी उत्कृष्ट खेळाडू ठरला. त्याच्या अपवादात्मक योगदानामुळे त्याला केवळ मालिका सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला नाही तर जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक म्हणून त्याची प्रतिष्ठाही वाढली आहे.
हे ही वाचा :
पीओकेशिवाय जम्मू- काश्मीर अपूर्ण
दिल्लीतील ‘त्या’ धमकीमागे राजकीय संबंध असलेली एनजीओ
जम्मूच्या नौशेरामध्ये नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंग स्फोट, ६ जवान जखमी!
आतिशी यांनी तोडले आचारसंहितेचे नियम, एफआयआर दाखल
बुमराह याने २०० वी कसोटी विकेट घेऊन मालिकेदरम्यान एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. हा ऐतिहासिक टप्पा गाठणारा तो चौथा सर्वात जलद खेळाडू ठरला. उल्लेखनीय म्हणजे, २० पेक्षा कमी सरासरीने २०० कसोटी बळी घेणारा तो इतिहासातील पहिला गोलंदाज ठरला.