जसप्रीत बुमहार कसोटी सामन्यातून बाहेर!

केएल राहुललाही संधी नाही

जसप्रीत बुमहार कसोटी सामन्यातून बाहेर!

इंग्लंडविरोधातील भारताचा चौथा कसोटी सामना शुक्रवार, २३ फेब्रुवारीपासून रांची येथे खेळला जाणार आहे. मात्र भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बूमराह याला भारतीय संघातून मोकळे करण्यात आले आहे. त्याच्यावरील कामाचा भार हलका करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने मंगळवारी याची माहिती दिली. बूमराहच्या जागी मुकेश कुमार याचे संघात आगमन झाले आहे. तर, फलंदाज केएल राहुलही अनफिट असल्याने चौथा सामना खेळू शकणार नाही.

‘जसप्तीर बुमराह याला रांची कसोटी सामन्यासाठी भारतीय संघातून मोकळे करण्यात आले आहे. मालिकेचा कालावधी आणि हल्ली त्यांच्याद्वारे केला गेलेला खेळ हे सर्व ध्यानात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आता मुकेश कुमार भारतीय संघाचा भाग असेल. त्यांना राजकोट कसोटी सामन्यात खेळवण्यात आले नव्हते. तर, केएल राहुल चौथ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. धर्मशाला येथे होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात तो खेळू शकेल की नाही, हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल,’ असे निवेदन बीसीसीआयने दिले आहे.भारताने इंग्लंडविरोधातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ने आघाडी घेतली आहे.

हे ही वाचा:

नेहरू-पटेल आणि मौलाना आझादही यूसीसी लागू करण्यास इच्छुक!

शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार; तर असिफ अली झरदारी नवे राष्ट्रपती

पुणे पोलिसांकडून ४ हजार कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

प्रख्यात कायदेतज्ज्ञ, पद्मविभूषण फली एस नरिमन यांचे निधन

इंग्लंडविरोधातील भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटिदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, आर. अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, देवदत्त पडिक्कल, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज, आकाशदीप

Exit mobile version