ठाकरे, शरद पवारांची स्क्रीप्ट जरांगे वाचत आहेत!

देवेंद्र फडणवीसांनी केले स्पष्ट

ठाकरे, शरद पवारांची स्क्रीप्ट जरांगे वाचत आहेत!

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रविवारी बेभान आरोप केले त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, जी स्क्रीप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते, पवार बोलत होते. नेमक्या तशाच स्क्रीप्टवर जरांगेंनी का मांडावे असा माझ्यापुढे प्रश्न आहे. यापाठीशी काय आहे, त्याची काही कल्पना आम्हाला आहे, योग्यवेळेला बाहेर येईल.

देवेंद्र फडणवीसांवर जरांगे घसरले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईतील फडणवीसांच्या सागर या बंगल्याकडे जाणार असल्याचे जाहीर केले आणि त्यांनी त्या दिशेने जालन्याहून कूच केले. संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, सागर बंगला हा सर्वांचाच आहे. तिथे कुणीही येऊ शकतो. तिथे कुणाचीही अडवणूक होणार नाही. दुसरी गोष्ट कुठल्या निराशेतून ते बोलतात, कुठली सहानुभूती त्यांना हवी ते मला माहीत नाही. ते बिनबुडाचे आहे. धादांत खोटे आहे हे त्यांनाही माहीत. मराठा समाजाकरिता मी काय केले, मराठा समाजालाही माहीत आहे. अण्णासाहेब विकास महामंडळ, आशेचं स्थान आहे त्याची सुरुवात मी केली. त्याच्या योजना माझ्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्या सुदृढ केल्या आहेत. कुणाच्या म्हणण्याने मराठा समाज विश्वास ठेवणार नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे.

 

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी रविवारी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आरोप केले त्यामुळे या आंदोलनाला राजकीय वळण लागले.

गेल्या दोन दिवसात मनोज जरांगे यांच्यावर त्यांच्यासोबत असलेल्या अजय महाराज बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर जरांगे यांनीही पत्रकार परिषद देत आपल्यापरीने बाजू मांडली. पण रविवारी ते एकदम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घसरले. देवेंद्र फडणवीसांनीच हे षडयंत्र रचले असल्याचा आरोप त्यांनी केला. मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस मला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून मी सलाईन लावणेच बंद केले आहे. नारायण राणे व अजय बारसकर यांच्या मागे फडणवीस आहेत असा आरोपही त्यांनी केला. जरांगे म्हणाले की, मी कोणत्याही पक्षाचा नाही. मी केवळ समाजाचा आहे. फडणवीस यांच्यामुळे सगेसोयऱ्यांबाबतच्या मागणीची पूर्तता केली जात नाही.

जरांगेंची भाषा राजकीय – मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम केलं. सरसकटची मागणी आली. राज्यात व्याप्ती वाढवा, सगेसोयरेबाबत अधिसूचना काढली, त्यावर हरकती आल्याआहेत, मागण्या बदलत गेल्या. मी मुख्यमंत्री म्हणून जालन्यात गेलो, ५६ मोर्चे झाले. कुठल्याही समाजाला त्रास झाला नाही. कुठे आग लावली, दगडफेक केली. मराठा समाज संयमी आहे. शिस्तीने आंदोलने केली. गालबोट जे लावत आहे त्यांच्यापासून सावध राहा. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. त्यांना अपेक्षित नव्हतं एवढ्या लवकर आरक्षण मिळेल. ४ लाख लोक काम करत होते. जरांगेंची भाषा राजकीय आहे. जरांगेंच्या मागून कुणीतरी बोलतंय. त्यांची भाषा पातळी सोडून आहे. कायदा कुणीही हातात घेऊ नये.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगेंच्या या आरोपांच्या निमित्ताने सांगितले की, राज्याच्या प्रमुखांनी दसऱ्याच्या वेळेस शपथ घेतली त्याप्रमाणे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षणाच्या प्रश्नातून मार्ग काढला. प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेला आहे आंदोलन करण्याचा. पण आपण काय बोलतोय, कुणाबद्दल बोलतोय याचा विचार केला पाहिजे. अधिकाऱ्यांशी बोलताना शिवराळ भाषा वापरली जाते. हे कोण करतंय, कुणाचं एवढं धाडस होतंय. राज्याचे प्रमुख जरांगेंना दोनवेळा भेटले जालना, नवी मुंबईत. राज्याची कायदा सुव्यवस्था चांगली राहावी. हा उद्देश आहे. पण जाणीवपूर्वक वक्तव्य केली जातात. अशी पद्धत महाराष्ट्रात नव्हती. काही बोललो ते खपतं हे चालणार नाही. सगळ्यांना नियम सारखे आहेत. लोकांमध्ये गैरसमज निर्माण करू नये.

हे ही वाचा:

२२ वर्षांपासून फरार असलेला दहशतवादी भुसावळ मध्ये सापडला!

फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार, जरांगेनी नौटंकी बंद करावी!

दोन हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा मास्टरमाइंड तामिळ चित्रपट निर्माता

महिनाभरात रामलल्लाच्या चरणी २५ किलो सोने, चांदीचे दागिने अर्पण

 

जरांगेंनी राजकारणात यावे

 

याबाबत भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, हे आरोप अत्यंत हास्यास्पद आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामुळे आरक्षण मराठा समाजाला दिले. तर सर्वप्रथम देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळाले. पण आजच्या वक्तव्यांमुळे जरांगे यांचा हेतू स्पष्ट झाला आहे. त्यापेक्षा त्यांनी राजकारणातच यावे. मराठा समाजाचे नुकसान करण्याचा अधिकार जरांगेंना नाही. त्यांनी आंदोलन केले. त्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. वचनाप्रमाणे १० टक्के आरक्षणाचा कायदाही पास झाला आहे. बेलगाम, चुकीचे आरोप केल्यामुळे देवेंद्र फडणवीसांची प्रतीमा अजिबात डागाळणार नाही. देवेंद्र फडणवीस जनतेला माहीत आहेत. सर्वा समाजाला सोबत नेणारे, मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण देणारे, परंतु, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या अक्षम नेतृत्वामुळे ते आरक्षण टिकले नाही. पण तरीही पुन्हा मराठा समाजाला १० टक्क्यांचे आरक्षण दिले आहे. अशा आरोपांमुळे फरक देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिमेवर होणार नाही.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला लोकशाही मार्गाने आंदोलन करणअयाचा अधिकार आहे. भाषेचा योग्य वापर करावा. अधिकाऱ्यांशी बोलताना शिरवाळ भाषेचा वापर योग्य नाही. संबंधित व्यक्तीच्या मागे कोण याचा शोध घ्यावा लागेल.

Exit mobile version