अंत्यसंस्काराचा खर्च टाळण्यासाठी वडिलांचा मृतदेह दोन वर्ष ठेवला कपाटात!

जपान पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक 

अंत्यसंस्काराचा खर्च टाळण्यासाठी वडिलांचा मृतदेह दोन वर्ष ठेवला कपाटात!

एका जपानी माणसाने अंत्यसंस्काराचा खर्च टाळण्यासाठी त्याच्या वडिलांचा मृतदेह दोन वर्षे घरातच एका कपाटात लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नोबुहिको सुझुकी असे आरोपी मुलाचे नाव आहे. एससीएमपीने दिलेल्या वृत्तानुसार, जानेवारी २०२३ मध्ये त्याच्या ८६ वर्षीय वडिलांचे निधन झाल्यानंतर आरोपी सुझुकीने मृतदेह लपवून ठेवला होता. जपान पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

आरोपी सुझुकीचे टोकियोमध्ये चायनीज रेस्टॉरंट असून त्याने ते एका आठवड्यापासून उघडले नव्हते. रेस्टॉरंट बंद असल्याने शेजाऱ्यांनी चिंता निर्म्ना झाली आणि त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी सुझुकीचे घर गाठले आणि तपासणी सुरु केली. याच दरम्यान, पोलिसांना घरातील कपाटात लपवलेला त्याच्या वडिलांचा सांगाडा सापडला.

पोलिसांनी नोबुहिको सुझुकीची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की त्याच्या वडिलांचे जानेवारी २०२३ मध्ये निधन झाले होते. अंत्यसंस्काराचा खर्च जास्त असल्याने कोठेही काहीही न सांगण्याचा निर्णय घेतला आणि मृतदेह कपाटात लपवल्याचे त्याने सांगितले. तथापि, आता वडिलांच्या मृत्यूबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत परंतु आरोपी सुझुकीने दावा केला की जेव्हा तो त्या दिवशी कामावरून घरी परतला तेव्हा वडील मृत आढळले.

हे ही वाचा : 

पहलगाम हल्ला : मृतांच्या आत्मशांतीसाठी विशेष यज्ञ

Viral Video : वरमाला दरम्यान वधूने वराच्या मित्राला मारहाण…

पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवाद मुर्दाबादच्या घोषणांमुळे राजस्थानात मुस्लिम अस्वस्थ

आता “मेक इन इंडिया” जागतिक स्तरावर

दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केला आहे, परंतु वडिलांचा मृत्यू कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह लपवून ठेवल्यानंतर वडिलांचे पेन्शन वसूल केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आहे. एससीएमपीने दिलेल्या वृत्तानुसार, जपानमध्ये अंत्यसंस्काराचा सरासरी खर्च सुमारे १.३ दशलक्ष येन (₹७.७३ लाख) इतका आहे. कोविड-१९ नंतर ६० टक्के पेक्षा जास्त लोक आता दहा लाख येन (सुमारे ₹ ६ लाख) पेक्षा कमी खर्च करण्याची अपेक्षा करतात.

107 पाकिस्तानी गायब, आपण त्यांना पाहिलत का? | Amit Kale | Pakistani Immigrants | Devendra Fadnavis |

Exit mobile version