नव्या तंत्रज्ञानासह जपानचे चांद्रयान अवकाशात झेपावले

लँडिंग तंत्रज्ञानामुळे याला प्रेमाने ‘मून स्निपर’ म्हणून ओळखले जाते

नव्या तंत्रज्ञानासह जपानचे चांद्रयान अवकाशात झेपावले

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारे लँडर घेऊन जाणारे रॉकेट जपानने गुरुवारी यशस्वीपणे प्रक्षेपित केले. विपरित हवामान परिस्थितीमुळे गेल्या महिन्यात रॉकेट प्रक्षेपणाची तारीख तीनवेळा पुढे ढकलण्यात आली होती. या अंतराळयानाचे वैशिष्ट्य म्हणजे हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर कोणत्याही जागी न उतरवता निश्चित केलेल्या, काटेकोर जागीच उतरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 

जपान एरोस्पेस एक्स्प्लोरेशन एजन्सी (जाक्सा)ने गुरुवारी हे रॉकेट दक्षिण जपानमधील तानेंगाशिमा स्पेस सेंटरमधून यशस्वीपणे प्रक्षेपित झाल्याची माहिती दिली. हे रॉकेट मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीजने साकारले असून त्याची देखरेखही याच कंपनीकडून केली जाणार आहे. या रॉकेटमध्ये जाक्साचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हिस्टिगेटिंग मून (स्लिम) अंतराळयान असून त्यातील लँडिंग तंत्रज्ञानामुळे याला प्रेमाने ‘मून स्निपर’ म्हणून ओळखले जाते. हे ‘स्लिम’ अंतराळयान पुढील वर्षी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. लुनार लँडरसमवेत या रॉकेटमधून जाक्सा, नासा आणि युरोपीयन स्पेस एजन्सी यांनी विकसित केलेला संशोधक उपग्रहही पाठवण्यात आला आहे.

 

हे ही वाचा:

स्माईल प्लीज! आदित्य एल- १ ने पाठवला पहिला सेल्फी

दहीहंडीच्या दिवशी ढगांचे थर आणि वर्षोल्हास

‘भारत’मुळे I.N.D.I.A.ला फुटला घाम

अक्षयकुमारच्या चित्रपटाच्या नावात आता ‘भारत’

चंद्राच्या पृष्ठभागावरील निश्चित ठिकाणापासून केवळ १०० मीटरच्या परिघाताच काटेकोरपणे अंतराळयान उतरवता यावे, अशा रीतीने या जपानच्या या ‘स्लिम’ अंतराळयानाची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळयान उतरवताना एवढा काटेकोरपणा पहिल्यांदाच पाळला जात आहे. या ‘स्लिम’चे महत्त्व जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेने अधोरेखित केले आहे.

 

‘स्लिम लँडर विकसित केल्यामुळे मानवाने संशोधनाची गुणवत्ता वाढवली आहे. या यानामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर जिथे यान उतरवणे सोपे आहे, तिथे ते उतरवण्यापेक्षा मानवाला खरोखरच जिथे यान उतरवायचे आहे, तिथे यान उतरवले जाईल. त्यामुळे भविष्यात अवकाशातील अन्य अवकाशीय पिंडांवर नियोजित ठिकाणी, काटेकोर जागी अंतराळयान उतरवले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version