प्रसिद्ध तेलुगू कोरिओग्राफर शेख जानी बाशा याला जानी मास्टर म्हणूनही ओळखले जाते. त्याने आपल्याच एका सहकारी असणाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली. पोलिसांनीही जानी मास्टरने दिलेल्या कबुलीला दुजोरा दिला आहे.
त्याने कथितपणे महिलेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली तेव्हा ती १६ वर्षांची होती. ती आता २१ वर्षांची आहे. ती २०१७ मध्ये एका डान्स रिॲलिटी शोदरम्यान जानीला भेटली. त्यानंतर त्याने तिला सहाय्यक कोरिओग्राफरची नोकरी ऑफर केली. पोलिसांकडे आणि तेलुगू राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत महिलेने आरोप केला आहे की जानीने सहा वर्षे, विविध शहरांमध्ये, त्यांच्या आऊटडोअर शूटच्या वेळी तिच्यावर अत्याचार केला.
कथित घटनांची सुरुवात २०२० मध्ये मुंबईतील हॉटेल मुक्कामादरम्यान झाली. तिने पोलिसांना सांगितले की या आऊटडोअर शूट्समध्ये ती सहसा तिची आई सोबत असते, पण त्यावेळी तिला तिकीट मिळाले नव्हते. तिने पुढे आरोप केला की, जानीने नंतर तिला धमकीसुद्धा दिली होती. त्याने तिची नोकरी गमावण्याची आणि चित्रपटसृष्टीतील भविष्यातील संधी गमावण्याची भीती दाखवली होती.
हेही वाचा..
‘लापता लेडीज’ चालला ऑस्कर वारीला!
‘दुर्गापूजा करायची असेल तर अल्लाहच्या नावाने ५ लाख द्या, नाहीतर कापले जाल’
पंजाबमध्ये ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर सापडल्या ‘लोखंडी सळ्या’
अमेरिकेत मोदींच्या भाषणादरम्यान श्रोत्यांना काशी मथुरेच्या मंदिरांची आठवण
पोलीस रिमांड अहवालात दाव्याचा तपशील आहे की जानी मास्टरने तिला त्याचा धर्म स्वीकारण्यासाठी आणि त्याच्याशी ‘लग्न’ करण्याचा प्रयत्नही केला. आर्थिक दबावामुळे अखेरीस तिला नोकरीच्या संधीसाठी जानीची मदत घेण्यास भाग पाडले त्यामुळे तिच्यावर आणखी अत्याचार झाले. तिच्या शेजाऱ्याने जानीला तिच्या घरी अनेकदा भेट दिल्याचे पहिले आहे. तिच्या आईच्या अनुपस्थितीत तिच्यासोबत बरेच तास एकटे घालवले, असल्याचे सांगितले.
जानी सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला १९ सप्टेबर रोजी गोव्यात अटक करण्यात आली होती. जानी मास्तर याला तेलुगू फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स आणि कामगार संघटनेकडून निलंबनासह व्यावसायिक परिणामांना सामोरे जावे लागले आहे.