30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषवाहतुकीची कोंडी आणि नोकरीपेशा सर्वसामान्यही कोंडीत

वाहतुकीची कोंडी आणि नोकरीपेशा सर्वसामान्यही कोंडीत

Google News Follow

Related

कोरोनाकाळात अनेक मुंबईकरांच्या नोकरीवर गदा आली. त्यामुळे हातात मिळेल ते काम करण्यासाठी आता मुंबईकर सरसावलेला आहे. मुंबईची जीवनवाहिनी रेल्वे सर्वसामान्यांना प्रवासासाठी बंद असल्यामुळे रस्तामार्गे कार्यालये गाठताना अनेकांचे हाल होत आहेत.

मुंबईमध्ये कार्यांलयांत येण्यासाठी डोंबिवली, ठाणे, कल्याण येथील अनेकांना केवळ रस्त्याशिवाय आता पर्याय नाही. बसेसमधील गर्दी पाहता आणि वाढते ट्रॅफिक पाहता अनेकांनी स्वतःची वाहने आता बाहेर काढली आहेत. त्यामुळेच आता रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. वाहनांची कोंडी, प्रदूषणाचा त्रास आणि डोक्यावर नोकरी टिकवण्याची कसरत अशा त्रासातून मुंबईकर सध्या जात आहे.

हे ही वाचा:

शिंदे, पालांडे यांची कोठडी ६ जुलैपर्यंत वाढविली

विधानसभा अध्यक्षपद निवडीच्या हालचालींना वेग

दहा हजार गुंड आणण्याचे आदेश मातोश्रीवरून?

पडळकरांवर झालेल्या हल्ल्यांनंतर भाजपा नेते आक्रमक

कशासाठी पोटासाठी म्हणत मुंबईकर घर ते कार्यालय या प्रवासासाठी दिवसातले चार ते पाच तास केवळ येण्याजाण्यासाठी घालवत आहे. यावरून विचार करा मुंबईतील रस्त्यांची अवस्था काय आहे. लोकलच नसल्यामुळे नोकरदारांचे अतिशय हाल होत आहेत.

मुंबईला इतर उपनगरांमध्ये जाण्यासाठी तसेच कार्यालयात जाण्यासाठी लोकल हा एकमेव उत्तम पर्याय आहे. रखडलेली मेट्रोची कामे यामुळे रस्तेवाहुतकीचा जीव गुदमरलाय. बेस्टमधून केवळ ५० टक्के वाहतूक मुभा असल्यामुळे कितीजणांना याचा लाभ घेता येणार हे असे अनेक प्रश्न सध्या मुंबईकरांच्या डोक्यात आहेत. नोकरी टिकवायची तर असेल तसे कार्यालयात पोहोचावे लागत आहे. किमान लस घेतलेल्यांना तरी लोकलप्रवास मुभा मिळावी असा आता सूर सर्व ठिकाणी उमटू लागलेला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा