जम्मू-काश्मीर: निकालापूर्वी दहशतवाद्यांचा कट हाणून पाडला, शस्त्रे-स्फोटके जप्त!

८ ऑक्टोबर रोजी निकाल, सुरक्षा व्यवस्था कडक

जम्मू-काश्मीर: निकालापूर्वी दहशतवाद्यांचा कट हाणून पाडला, शस्त्रे-स्फोटके जप्त!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी शस्त्रे आणि स्फोटके सापडली आहेत. सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान नुकतेच पार पडले, ८ ऑक्टोबर रोजी निकाल आहे. याच पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूच्या घरोटा भागात पोलिस आणि लष्कराच्या गस्ती पथकाला रस्त्याच्या कडेला एक संशयास्पद वस्तू आढळून आली. तपासादरम्यान ते स्फोटक असल्याचा संशय आला. त्यानंतर ही माहिती बॉम्ब निकामी पथकाला देण्यात आली. यानंतर पथकाकडून संशयित स्फोटक नंतर नष्ट करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, लष्करासह संयुक्त गस्त सुरू असताना स्फोटक सापडले.

हे ही वाचा : 

इस्रायलचा गाझामधील मशिदीवर हवाई हल्ला, १८ ठार!

स्त्री शक्तीचा जागर: स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई!

दुर्गेचे चौथे रूप ‘कुष्मांडा’ – दधाना हस्त पद्माभ्यां कूष्मांडा शुभदास्तुमे

महाराष्ट्रातील विकासाच्या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर ठेवा

दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील पुंछ भागात लष्कराला मोठे यश मिळाले. जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील झुल्लास भागात लष्कराच्या रोमियो फोर्सने शस्त्रे आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे ही शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी एका संशयित दहशतवाद्याची बॅग सापडली. त्याच्या झडतीदरम्यान बॅगमधून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली.

यामध्ये पाकिस्तानी बनावटीचे एके ४७, पिस्तुल राउंड, आरसीआयईडी, टाइम्ड डिस्ट्रक्शन आयईडी, स्टोव्ह आयईडी, आयईडीसाठी स्फोटक आणि चिनी ग्रेनेड सारख्या अत्याधुनिक स्फोटकांचा समावेश आहे. दहशत पसरवण्याच्या उद्देशाने त्यांचा वापर केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, सुरक्षा दलांचे ऑपरेशन अजूनही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Exit mobile version