जम्मूच्या ज्वेलर्सने नरेंद्र मोदींसाठी बनवले चांदीचे कमळ!

देशभरातील भाजप समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण

जम्मूच्या ज्वेलर्सने नरेंद्र मोदींसाठी बनवले चांदीचे कमळ!

एनडीएचे प्रमुख नेते नरेंद्र मोदी आज (९ जून) तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.राष्ट्रपती भवनामध्ये हा सोहळा पार पडणार आहे.यासाठी देशभरातील भाजप समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. दरम्यान, जम्मूतील एका भाजप समर्थकाने यासाठी भव्य चांदीचे कमळ तयार केले आहे.नरेंद्र मोदींना भेट म्हणून देण्यासाठी कार्यकत्याने हे चांदीचे कमळ तयार केले आहे.

जम्मूतील रिंकू चौहान यांनी हे चांदीचे कमळ तयार केले आहे.रिंकू चौहान यांचे जम्मूमध्ये ज्वेलर्सचे दुकान असून ते भाजप कार्यकर्ते आहेत.रिंकू चौहान यांनी शपथविधी कार्यक्रमापूर्वी भाजपचे चांदीचे कमळ हे निवडणूक चिन्ह तयार केले आहे.३ किलोच्या चांदीपासून या कमळाची निर्मिती झाली आहे.जम्मू-काश्मीर आणि देशाबाबत भाजपच्या धोरणांवर ते खूप खूश आहेत, त्यामुळेच त्यांनी हे कमळ बनवले आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसची ‘खटाखट योजना’ म्हणजे मतदारांना लाच देणे; ९९ खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी

एअर कॅनडाच्या विमानाला टेकऑफनंतर आग; विमान सुरक्षितपणे उतरवण्यास यश!

काँग्रेसच्या प्रमुखांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण!

संगीतकार विशाल दादलानीला सोशल मीडियावर ठोकून काढले!

रिंकू चौहान म्हणतात की, मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवून राज्यात शांतता प्रस्थापित केली आहे. याशिवाय त्यांनी देशात अनेक विकास कामे केली आहेत, म्हणूनच त्यांनी हे ३ किलो चांदीचे कमळ बनवले आहे. पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांना हे चांदीचे कमळ भेट म्हणून द्यायचे आहे.

 

Exit mobile version