रशियाच्या संकटातून सुखरूप परतला जम्मू-काश्मीरचा आजाद, पंतप्रधानांचे मानले आभार!

४५ भारतीयांची सुटका, ५० जणांच्या सुटकेच प्रयत्न सुरु

रशियाच्या संकटातून सुखरूप परतला जम्मू-काश्मीरचा आजाद, पंतप्रधानांचे मानले आभार!

पंतप्रधान मोदी सरकारच्या पुढाकारानंतर रशियात अडकलेल्या ४५ भारतीयांची सुटका करून त्यांना देशात परत आणण्यात आले आहे. लवकरच आणखी ५० जणांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. या भारतीय नागरिकांचा रशियन लष्करात समावेश होता. युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाच्या बाजूने लढण्यासाठी हे लोक स्वेच्छेने सैन्यात सामील झाले होते. पण आता त्यांना पुन्हा भारतात परतायचे होते. पंतप्रधान मोदींना याची माहिती मिळताच आपल्या रशिया दौऱ्यादरम्यान त्यांनी हा मुद्दा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासमोर मांडला होता. त्यानंतर रशियात अडकलेल्या भारतीय नागरिकांना पुन्हा भारतात आणण्याचे काम सुरु झाले.

रशियातून सुटका करण्यात आलेल्या भारतीयांमध्ये दक्षिण काश्मीरच्या अवंतीपोरा जिल्ह्यातील रहिवासी आजाद युसूफ कुमारचा समावेश आहे. आजादने युद्धग्रस्त प्रदेशात कठोर परिश्रम केले, प्रशिक्षणादरम्यान त्याला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला होता. मोदी सरकारच्या पुढाकारानंतर तो भारतात परतला असून जवळपास दोन वर्षांनंतर आपल्या कुटुंबाला भेटणार असल्याचे याचा त्याला आनंद आहे.

हे ही वाचा : 

पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफने पाठवले ‘यमसदनी’

पुढच्या वर्षी लवकर या… २३ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाला भावूक निरोप

बुलढाणा; जळगाव जामोद शहरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक !

लेबनॉनमध्ये स्फोट झालेले तैवान निर्मित पेजर्स युरोपियन कंपनीने बनवले

पीटीआयच्या म्हणण्यानुसार, आजादने सांगितले की, रशियन कमांडर आमच्या समोर आला आणि त्याने आमची नावे वाचून दाखविली आणि तुम्ही भारतात परत जा असे सांगितले. तुमचा करार रद्द करून तुम्हाला भारतात पुन्हा पाठवण्यात येत आहे, असे सांगितले. रशियाच्या अधिकाऱ्याने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील भेटीचा हवाला देत त्यांच्या भेटीच्या स्थितीवर परिणाम झाल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदींचे कौतुक करत आजाद म्हणाला, पंतप्रधान मोदींच्या रशिया दौऱ्यामुळे मी आज सुरक्षित पुन्हा माझ्या घरी जात आहे. यासाठी पंतप्रधान मोदींचे त्याने आभार मानले.

Exit mobile version