जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. लाल चौक हा गजबजलेला परिसर असून अचानक झालेल्या स्फोटानंतर येथे घबराट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. श्रीनगरच्या लाल चौकात दोन-तीन ग्रेनेड फेकल्याची माहिती सध्या समोर आहे. या हल्ल्यात १० जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हल्ल्यानंतर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.
जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि सरकारही स्थापन झाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि निवडणुका पार पडल्यानंतर काही प्रमाणात बंदोबस्तात शिथिलता आलेली होती. याच संधीचा फायदा घेवून दहशतावाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याची माहिती आहे. निवडणुकीनंतर हा पहिलाच हल्ला आहे. दरम्यान, या हल्ल्या प्रकरणी मुख्यमंत्री किंवा सत्ताधारी पक्षांकडून अद्याप तरी कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. पोलिसांकडून स्फोटाची चौकशी सुरु आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
हे ही वाचा :
हत्तींच्या हल्य्यात दोघांचा मृत्यू
जरांगे म्हणतात, कुणाची तरी जिरवायची आहे!
झारखंडमधील बांगलादेशातील घुसखोरांना बाहेर काढणार
‘असदुद्दीन ओवेसींकडून मुस्लिमांना भडकवण्याचे काम’
#WATCH | Jammu and Kashmir: Militants hurled grenade at TRC, Sunday market in Srinagar. More details awaited. pic.twitter.com/97EGapejDT
— ANI (@ANI) November 3, 2024