जम्मू काश्मीर निवडणूक: पंतप्रधान मोदी, गडकरींसह ४० नेत्यांकडे सूत्रे !

भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

जम्मू काश्मीर निवडणूक: पंतप्रधान मोदी, गडकरींसह ४० नेत्यांकडे सूत्रे !

निवडणूक आयोगाकडून जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यातच निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या ४० नेत्यांच्या यादीत महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश आहे.

स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासह इतर नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ६ सप्टेंबरपासून दोन दिवसांच्या जम्मू दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीदरम्यान अमित शाह जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा (भाजप) जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री डॉ.निर्मल सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली.

जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले. यानंतर पहिल्यांदाच निवडणुका होणार आहेत. तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी ९० विधानसभा जागांसाठी मतदार मतदान करतील. दरम्यान, ८ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

हे ही वाचा :

तीन दिवसांत भाजपाशी जोडले १ कोटी लोक

भारताचा पदकांचा ‘रौप्यमहोत्सव’, पॅरालिम्पिकमध्ये परमारला ऐतिहासिक कांस्य !

लोअर परळच्या कमला मिल परिसरात पुन्हा आगीचे लोट !

‘लाडकी बहीण’ योजनेवरून खोटा आरोप करणाऱ्या आव्हाडांविरोधात गुन्हा

दरम्यान, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी झाली आहे. राज्यातील ९० जागांपैकी काँग्रेस ३२ जागांवर तर नॅशनल कॉन्फरन्स ५१ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे.

Exit mobile version