जम्मू काश्मीर निवडणूक: पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या हाती नेतृत्व !

भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

जम्मू काश्मीर निवडणूक: पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या हाती नेतृत्व !

निवडणूक आयोगाकडून जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः काश्मीरमधील प्रचाराची धुरा सांभाळताना दिसतील. पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचा देखील यादीमध्ये समावेश आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुका १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यांत होणार आहेत. तर, ४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये ९० जागांसाठी निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज (२६ ऑगस्ट) ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली.

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत अनेक केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री मनोहर लाल खट्टर, जी किशन रेड्डी, डॉ. जितेंद्र सिंह. यासह शिवराज सिंह चौहान, जयराम ठाकूर, भजनलाल शर्मा, राम माधव, अनुराग ठाकूर, स्मृती इराणी, जनरल व्ही के सिंह (निवृत्त), रविंदर रैना आणि दोन माजी उपमुख्यमंत्री डॉ.निर्मल सिंह, कविंदर गुप्ता, यांचा समावेश आहे.

हे ही वाचा :

सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला !

आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रूपांतर करावे

जीपीएस बिघडल्याने दिशा चुकली, अन जीवाला मुकले !

‘बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सुरक्षित रहेंगे’

दरम्यान, जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज १५ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली.  पक्षाने सुरवातीला ४४ जणांची यादी जाहीर केली होती. मात्र, थोड्याच वेळात जाहीर केलेली यादी मागे घेत नवी यादी जाहीर केली, ज्यामध्ये १५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.

 

Exit mobile version