जम्मू काश्मीर: माजी एसएसपी मोहनलाल भगत यांचा भाजपमध्ये प्रवेश !

अध्यक्ष रविंदर रैना, खासदार जुगल किशोर शर्मांच्या उपस्थिती

जम्मू काश्मीर: माजी एसएसपी मोहनलाल भगत यांचा भाजपमध्ये प्रवेश !

जम्मू काश्मीरमधील मोहन लाल भगत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मोहन लाल भागत हे माजी एसएसपी असून  अखनूर शहरातील रहिवासी आहेत. जम्मू-काश्मीरमधील भाजप कार्यालयात जम्मू-काश्मीर भाजपचे अध्यक्ष रविंदर रैना, लोकसभा खासदार जुगल किशोर शर्मा आणि नेत्यांच्या उपस्थित अखनूरचे पूर्व एसएसपी मोहन लाल भागत यांचा पक्ष प्रवेश पार पडला.

यावेळी भाजपचे अध्यक्ष रविंदर रैना यांनी भाष्य करत पंतप्रधान मोदींनी गोर-गरिबांच्या हितासाठी चालू करण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली. त्यांनी सर्वांच्या विकासासाठी भाजपच्या वचनबद्धतेवर भर दिला आणि विरोधी आघाडीवर टीका केली.

नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीवर निशाणा रविंदर रैना यांनी निशाना साधला. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रभावाच्या भीतीने फारुख अब्दुल्ला यांचा पक्ष नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेससोबत युती केल्याचा आरोप त्यांनी केला.

हे ही वाचा :

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बस अडवत ओळख विचारून प्रवाशांवर झाडल्या गोळ्या

युक्रेनचा रशियातील मोठ्या इमारतीवर ड्रोन हल्ला, चार जखमी !

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

भाजपाकडून जम्मू- काश्मीरसाठी ४४ उमेदवारांची यादी जाहीर

लोकसभा खासदार जुगल किशोर शर्मा यांनी देखील पक्षाप्रवेशावर भाष्य केले. शर्मा यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचे स्वागत केले आणि म्हणाले की त्यांच्या प्रवेशामुळे या प्रेशात पक्ष अधिक मजबूत होईल. आपल्या व्यावसायिक जीवनापूर्वी मोहनलाल भगत यांनी संपूर्ण उत्साहाने समाजाची सेवा केली आणि पक्षाला खात्री आहे की ते गरजूंची सेवा करतील आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी काम करतील.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुका लवकरच पार पडणार असून त्या १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला तीन टप्प्यांत होणार आहेत. तर, ४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये ९० जागांसाठी निवडणुका होत आहेत. यासाठी भाजपाने ४४ जागांसाठी उमेदवारांची यादी आज (२६ ऑगस्ट) जाहीर केली आहे. भाजपमध्ये प्रवेश करणारे मोहन लाल भागत यांचे देखील या यादीमध्ये नाव असून त्यांना अखनूर मधून उमेदवार देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपने जाहीर केलेली जाहीर तात्पुरती स्थगित केली आहे.

Exit mobile version