भारताच्या इतिहासलेखनात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ब्रिटिश नाणकशास्त्रज्ञ आणि पुरातत्वशास्त्रज्ञ जेम्स प्रिन्सेप हा २८ वर्षांचा असताना भारतात आला तो ब्रिटिश एशियाटिक सोसायटीचा सर्वात तरुण सहकारी होता. त्याने ब्राह्मी आणि खरोस्ती लिपींचा उलगडा केला आणि सम्राट अशोकाच्या कारकिर्दीबद्दलची माहिती जगासाठी उपलब्ध करून दिली. याच प्रिन्सेपने वाराणसीची भूमिगत सांडपाणी व्यवस्था बांधली. १६६९ मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाने बांधलेली आलमगीर मशीद पुनर्संचयित केली आणि शहराचे नकाशे तयार केले. १८३१ मध्ये त्यांनी ‘बनारस इलस्ट्रेटेड, अ सीरीज ऑफ ड्रॉइंग’ हे पुस्तकही प्रकाशित केले. हे पुस्तक आणि नकाशा ज्ञानवापी संदर्भातील कायदेशीर लढाईत हिंदू समाजाच्या बाजूने पुराव्याचा भाग म्हणून वापरला जाऊ शकतो.
जेम्स प्रिन्सेप यांनी प्रथम कलकत्ता (आता कोलकाता) आणि नंतर बनारस (आता वाराणसी) येथे त्यांचे १० वर्षे वास्तव्य होते. वारानासिमधील त्यांचे वास्तव्य सध्या ज्या गोष्टी घडत आहेत त्यासाठी महत्वाच्या आहेत. बनारस इलस्ट्रेटेडमध्ये जेम्स प्रिन्सेपने लिथोग्राफीचा वापर करून प्रत्येक दृश्य हे कागदावर कोरले आणि पुराव्यासह माहिती सादर केली आहे. त्यांच्या लिखाणात आणि चित्रांमध्ये मुनिकुर्णिका घाट, ब्रह्मा घाट, ताजींची मिरवणूक आणि हिंदू नच गर्ल्स यांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेम्स प्रिन्सेप यांनी ‘बनारस इलस्ट्रेटेड’ मध्ये जुन्या विश्वेश्वर मंदिराच्या स्थापत्यकलेची आणि मूळ प्रार्थनास्थळाचे रूपांतर सध्याच्या ज्ञानवापी मशिदीत कसे झाले याबद्दल चर्चा केली आहे. विश्वेश्वर किंवा विश्वाचा देव हे भगवान शिवाचे दुसरे नाव आहे.
हेही वाचा..
पाकिस्तान: बलुचिस्तानमध्ये दोन ठिकाणी स्फोट, २२ ठार!
इंग्रजांचा प्रभाव असलेली काँग्रेस आऊटडेटेड
नांदेड: धार्मिक कार्यक्रमात जेवणानंतर तब्बल २००० लोकांना अन्नातून विषबाधा!
उत्तरप्रदेश: आरएलडी पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी भाजपसोबत युती करण्याच्या मार्गावर?
बनारस इलस्ट्रेटेडमध्ये प्रिन्सेपने औरंगजेबाच्या माणसांनी ज्ञानवापी मशीद बांधण्यासाठी नष्ट झालेल्या काशी विश्वेश्वर मंदिरातील साहित्य कसे वापरले याचे तपशील सुद्धा दिले आहेत. औरंगजेबाच्या कट्टरतेने या अधिक प्राचीन शैलीचे अनेक अवशेष राहू दिले नाहीत. १६६० मध्ये कॅपिटेशन टॅक्स लादण्याच्या काही क्षुल्लक प्रतिकारासाठी त्याने मुख्य शिवालये पाडण्याचे काम केले. त्याच साहित्यातून आणि इमारतीच्या त्याच पायावर मशिदी बांधल्या. कशी विश्वेश्वर मंदिराचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे कारण हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे. जिथे भगवान शिव प्रकाशाच्या स्तंभाच्या रूपात प्रकट झाल्याचे म्हटले जाते. भगवान शिवाने तेथे पाणी निर्माण करणारे स्थान निर्माण केले म्हणून ज्ञानवापी (ज्ञानाची विहीर) असे नाव आहे.
आदि विश्वेश्वर मंदिर ११९४ मध्ये मुहम्मद घोरीचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबक याने नष्ट केले होते. परंतु, ते पुन्हा बांधले गेले. औरंगजेबानेच १६६९ मध्ये काशी विश्वेश्वर मंदिर पुन्हा उद्ध्वस्त केले आणि त्याच पाया आणि साहित्य वापरून ज्ञानवापी मशीद बांधली. हा प्रकार अयोध्येतील बाबरी मशीद बांधण्यासाठी वापरण्यात आलेल्या बाराव्या शतकातील नष्ट झालेल्या मंदिरातील साहित्य वापरण्यासारखे आहे. बाबरी मशीद १५२८ मध्ये बाबरचा सेनापती मीर बाकी याने बांधली होती. बाबर हा भारतातील पहिला मुघल शासक होता. औरंगजेब हा त्या घराण्यातील शेवटचा राजा होता. त्यानंतर प्रिन्सेपने विश्वेश्वर मंदिराची जुनी योजना उघडकीस आणली आणि त्यावर औरंगजेबाने बांधलेली मशीद कशी उभी राहिली याचा नकाशा काढून त्यावर खूण केली. पण १९ व्या शतकात वाराणसीला आलेल्या प्रिन्सेपला १७ व्या शतकात औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेल्या जुन्या काशी विश्वेश्वर मंदिराचा नकाशा सुमारे १६० वर्षांच्या अंतरानंतर कसा काय समोर येईल? तर प्रिन्सेप यांनी ‘बनारस इलस्ट्रेटेड’ मध्ये जुन्या विश्वेश्वर मंदिराचा नकाशा नेमका कसा काढला याचे स्पष्टीकरण दिले आहे.
पुरातनवाचकांना आनंद होईल की मौसुलमानांनी त्यांच्या स्वतःच्या धर्माच्या विजयाच्या आवेशात मूळ वास्तूला त्याच्या अर्ध्या भागाच्या भिंती नष्ट न करता एका विशाल मशिदीत रूपांतरित करण्याची पद्धत शोधून काढली. जेणेकरुन केवळ जमिनीचा आराखडाच नाही तर संपूर्ण वास्तुशिल्प उंचीचा अजूनही शोध घेता येईल. जुन्या विश्वेश्वर मंदिराची योजना या प्रकरणात प्रिन्सेपने नकाशा समाविष्ट केला आहे. जुन्या काशी विश्वेश्वर मंदिरात आठ मंडप होते आणि मध्यभागी प्रिन्सेप ज्याला ‘महादेव’ म्हणतो हे त्यात दर्शवले गेले आहे. दरम्यान हे पुस्तक आणि नकाशा ज्ञानवापी प्रकरणात समोर ठेवलेल्या पुराव्याचा भाग असेल, असे हिंदू समाजाच्या बाजूने न्यायालयात मांडण्यात येईल असे वकील विष्णू जैन यांनी सांगितले.