आपल्या हटके अंदाजासाठी आणि बेधडक स्वभावासाठी प्रसिद्ध असणारे हॉलीवूड पटातील अजरामर पात्र म्हणजे जेम्स बॉण्ड. इयन फ्लेमिंग यांच्या लेखणीतून साकारला गेलेला ब्रिटिश गुप्तहेर जेम्स बॉण्ड हा जगभर चांगलाच गाजला. ००७ म्हणून जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा जेम्स बॉण्ड आता महाराष्ट्राच्या राजकारणात पण अवतारलाय का? असा प्रश्न विचारला जात आहे.
या प्रश्नाचे मूळ आहे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर. बुधवार, ३० जून रोजी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाली आणि राज्याच्या राजकारणात एकच हलकल्लोळ उडाला. महाराष्ट्रभर या हल्ल्याची फारच चर्चा झाली. राजकीय आखाडा रंगला. पण त्यासोबतच चर्चा रंगली पडळकर यांच्या गाडीची. पडळकर यांच्या गाडीचा नंबर ००७ हा आहे.
हे ही वाचा:
पाच लाख लशींच्या कुप्या गायब झाल्या तरी कुठे?
आता बस झाले! दुकानांची वेळ वाढवा!!
दहा हजार गुंड आणण्याचे आदेश मातोश्रीवरून?
भारत सरकारतर्फे पीक विमा सप्ताहाचा शुभारंभ
पडळकर यांच्या गाडीचा ००७ हा नंबर जेम्स बॉण्ड या पात्राची आठवण करून देतो. पण पडळकर यांचा स्वभावही बॉण्ड या पात्राच्या स्वभावाशी मिळता जुळता आहे. बॉण्ड हे पात्र शांत डोक्याने काम करणारे पण आक्रमक स्वभाव असलेले आहे. आमदार गोपीचंद पडळकर हे देखील स्वभावाने असेच आहेत. ते देखील महाराष्ट्राच्या राजकारणात आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. तर जेम्स बॉण्ड या पत्रासारखेच ते निर्भीड आणि निडर आहेत.
बॉण्डची आणखीन एक खासियत म्हणजे शत्रूच्या गोटात घुसून शत्रूला शिंगावर घेण्याची हातोटी. अशीच कार्यपद्धती थोड्या फार प्रमाणात पडळकर यांचीही दिसून येते. आणखीन एक पैलू म्हणजे जेम्स बॉण्ड प्रमाणेच पडळकर यांनी देखील चित्रपटात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. धुमस नावाच्या एका मराठी चित्रपातून पडळकर यांनी आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. पडळकरांचा हा चित्रपट हा देखील जेम्स बॉण्डच्या चित्रपटांसारखा ‘ऍक्शन पॅक’ चित्रपट होता. त्यामुळे या साऱ्या गोष्टी लक्षात घेता पडळकरांच्या रूपाने महाराष्ट्राच्या राजकारणात जेम्स बॉण्डची एन्ट्री झाली आहे असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.