उत्तर बंगालमधील जयपैगुडी जिल्ह्यात रविवारी दुपारी आलेल्या वादळात एका महिलेसह पाच जण ठार तर, ५०० जण जखमी झाले. तर, अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. वादळात अनेक घरांचे नुकसान झाले आहे.मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपले सर्व नियोजित दौरे रद्द केले असून त्या रात्रीच जलपैगुडी येथे पोहोचल्या आहेत. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक रुग्णालयाला भेट दिली. रविवारी दुपारी साडेतीन वाजता आलेले हे वादळ सुमारे १० मिनिटे सुरू होते. या वादळाचा अनेक गावांना फटका बसला.
‘प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी असून ते शक्य तो सर्व मदत पुरवत आहेत. आम्हाला झालेल्या नुकसानीची जाणीव आहे. प्रशासन या पीडितांच्या मागे भक्कमपणे उभी आहे,’ अशी ग्वाही बॅनर्जी यांनी दिली. डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचारी चांगले काम करत आहेत. बचाव मोहीम याआधीच पूर्ण झाली आहे,’ असे बॅनर्जी यांनी सांगितले. अशाच प्रकारचे वादळ अलिउपूरदुआर आणि कूचबिहार जिल्ह्यांतही आले.
हे ही वाचा:
गेल्या १० वर्षांत जे काही घडले ते केवळ ट्रेलर!
ताजमहाल नाही पहिली पसंती अयोध्या!
छिंदवाड्यात काँग्रेसला धक्का, विक्रम आहाके यांचा भाजपमध्ये प्रवेश!
सीतेच्या हातून रावणाला गोमांस; रामायणाची खिल्ली उडवणाऱ्या नाटकावर आक्षेप
परंतु तेथे कोणत्याही जीवितहानीची नोंद झाली नाही. पंतप्रधान मोदी यांनीही या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अधिकाऱ्यांशी बोलून पीडितांना शक्य तो सर्व मदत पुरवण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. या वादळामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले, झाडे उन्मळून पडली आणि विजेचे खांब उखडले गेले.
जलपैगुडी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी सकाळी चार जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्यांची नावे द्विजेंद्र नारायण सरकार (५२), अनिमा रॉय (४९), जोगन रॉय (७०) आणि समर रॉय (६४) अशी आहेत. राज्यपाल सीव्ही आनंद बोसही सोमवारी जलपैगुजीच्या दौऱ्यावर जाऊन वादळग्रस्त भागाला भेट देणार आहेत.