जालन्याचे पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर

मराठा समाज आंदोलनावेळचा लाठीचार्ज भोवला

जालन्याचे पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर

जालना जिल्ह्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरु असताना पोलिसांनी मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यात मराठा आंदोलक जखमी झाले. त्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. अशातच राज्य सरकारने जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. गृहमंत्रालयाच्या वतीने तसे आदेश काढण्यात आले आहेत.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटे येथे तीन दिवसापूर्वी ही घटना घडली होती.

हेही वाचा..

सेव्हन हिल्समध्ये गरीब रुग्णांना मोफत सेवा पुरवा!

धर्मांतर कराल तर सावधान… शासकीय लाभ मिळणार नाहीत

भारतातील नव्या वातावरणामुळे चित्त्यांचे मृत्यू !

लैंगिक अत्याचार करत ब्लॅकमेल करणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्याने केले ठार

लाठीमारानंतर मराठा समाज आक्रमक झाला. जालन्यासह राज्यात इतरत्र आंदोलने करण्यात आली. रास्ता रोको करण्यात आला. मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. अशातच गृहमंत्रालयाकडून जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. दोषी यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी लाठीचार्ज केला, असा आरोप आंदोलनकर्ते करत आहेत. दरम्यान सरकारने केलेल्या या कारवाईचेही आंदोलनकर्त्यांनी स्वागत केले आहे.

 

 

Exit mobile version