पुण्यातील ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरण सध्या देशभर गाजतंय. मात्र अशीच घटना काही दिवसांपूर्वी जळगावमध्ये घडली होती.पुण्यातील घडलेल्या घटने सारखेच बऱ्यापैकी जळगाव प्रकरणात साम्य आहे.या ठिकाणी देखील दुचाकीला धडक देणारे आरोपी राजकारणी आणि बिल्डरची मुले आहेत.दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना ७ मे रोजी घडली होती.आशा सेविका असणाऱ्या राणी चव्हाण या निवडणूक ड्युटी संपवून घरी परतत होत्या.त्यावेळी दुचाकीवर त्यांच्यासोबत त्यांची दोन मुले आणि १६ वर्षीय त्यांचा भाचा होता.या दरम्यान जळगावच्या रामदेववाडी जवळ एका कारणे राणी चव्हाण यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.या दुर्घटनेत राणी चव्हाण यांच्यासह तिन्ही मुलांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा:
डोंबिवलीच्या एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; परिसरातील इमारतीच्या काचा फुटल्या
तृणमूल नेत्याची मुक्ताफळे; पीओके म्हणजे दुसऱ्या देशाची जमीन
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भिंडेवर १०० वेळा कारवाई
‘दीड लाख लिटर दारूच्या बाटल्यांवर बुलडोझर’
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या कारणे धडक दिली त्यामध्ये दोन तरुण होते.यातील एक जण जळगावच्या अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाच्या मुलगा आहे तर दुसरा बिल्डरचा मुलगा आहे.या दुर्घटनेत आरोपी देखील जखमी झाले.याचे कारण देत पोलिसांनी आरोपीना मुंबईतील रुग्नालयात भरती केलं.अपघातावेळी हे दोन्ही आरोपी दारूच्या नशेत होते, असा आरोप कुटुंबीयांनी केला.तसेच त्यांच्या गाडीत गांजा देखील मिळाला, मात्र पोलिसांनी या संदर्भात उशिराने कलम लावल्याचाही आरोप आहे.विशेष म्हणजे अपघात होऊन १७ दिवस उलटून गेले मात्र, आरोपींचे ब्लड रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत.
यासंदर्भात माहिती देताना डीवायएसपी संदीप गावित म्हणाले की, अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एक महिला अन तीन लहान मुलांचा समावेश होता.गुन्ह्याचे गांभीर्य पाहता सदोष मनुष्य वधाचे सेशन अप्लाय केलं आहे.तसेच गाडीमध्ये १० ग्राम गांजा आढळून आला होता.त्याअंतर्गत कलम लावलं आहे.या घटनेत दोन्ही आरोपी जखमी झाले होते.त्यामुळे त्यांना मुंबईत रुग्नालयात दाखल करण्यात आले होते.दोघांनाही आता मुंबईतून अटक करण्यात आली असून त्यांना जळगावला आणण्यात येत आहे.या घटनेत अभिषेक अर्णव कौल कार चालवत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले.