‘हर घर जल’…२३ महिन्यांत ४.५ कोटी घरांना नळ जोडणी

‘हर घर जल’…२३ महिन्यांत ४.५ कोटी घरांना नळ जोडणी

भारत सरकारच्या जल जीवन मिशन या महत्वाकांक्षी योजनेने एक महत्वाचा टप्पा पार केला आहे. या योजनेच्या अंतर्गत १ लाख गावे आणि ५० हजार ग्रामपंचायतींमध्ये नळ जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या २३ महिन्यांत देशभरातील ४.५ कोटी घरांना नळ जोडणी देण्यात आली आहे.

२०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जल जीवन मिशन ही केंद्र सरकारची योजना फार वेगाने राबवली जात आहे. बुधवार, १४ जुलै रोजी या अभियानाने एक महत्वाचा टप्पा पार केला आहे. २३ महिन्याच्या अगदी थोड्या कालावधीत भारतातल्या १ लाख गावांतल्या प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याची कामगिरी साध्य करण्यात आले आहे. या महत्वाकांक्षी कार्यक्रमाच्या सुरवातीला देशातल्या १८.९४ कोटी ग्रामीण घरांपैकी केवळ ३.२३ कोटी (१७%) घरांमधेच नळ जोडणी होती.

हे ही वाचा:

आयुर्वेद, होमिओपॅथीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारचा मोठा निर्णय

 

केंद्र सरकारने दिली खुशखबर…महागाई भत्त्यात वाढ

काश्मीरमधील गावात जेव्हा पहिल्यांदाच वीज पोहोचते…

पियुष गोयल भाजपाचे राज्यसभेतील नेते

कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरु असतानाही जल जीवन मिशननेअतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गेल्या २३ महिन्यांच्या काळात या योजनेच्या अंतर्गत ४.४९ कोटी नळ जोडण्या दिल्या आहेत. त्याच बरोबर ५० हजार ग्राम पंचायतीमधल्या प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा करत या ग्राम पंचायतींमध्ये ‘हर घर जल’ साध्य केले आहे.

Exit mobile version